नांदेड : प्रवाशांच्या सोयीकरिता आणखी दोन विशेष गाड्या  

प्रल्हाद कांबळे
Sunday, 29 November 2020

या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील

नांदेड : प्रवाशांच्या सुविधेकरिता दक्षिण मध्य रेल्वे ता. एक डिसेंबरपासून आणखी एक तर ११ डिसेंबरपासून दुसरी विशेष गाडी सुरु करण्यात येणार आहे.

या दोन्ही रेल्वे संपूर्ण आरक्षित आहेत. अनारक्षित प्रवाशांना या गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही. या गाडीच्या वेळा पुढील प्रमाणे असतील -

०२७१३ वरंगल, काझिपेट दर सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शनिवार नरसापुर
११.०५ वाजता सुटेल नगरसुल ०६.५५ वाजता पोहोचेल.
एक डिसेंबरपासून ०२७१४ काझिपेट, वरंगल दर मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, रविवार नगरसुल
१२.५० वाजता सुटेल नरसापुर ०८.३५  वाजता पोहोचेल.
ता. दोन डिसेंबरपासून ०७२३१ मार्गे गुंटूर दर रविवार, शुक्रवार नरसापुर ११.०५ वाजता सुटेल नगरसुल ०९.४५ वाजता पोहोचेल.
ता. ११ डिसेंबरपासून ०७२३२ मार्गे गुंटूर  सोमवार, शनिवार नगरसुल १२.५०  वाजता सुटेल.नरसापु ०९.४० वाजता पोहोचेल. 
प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर तसेच या गाडीत प्रवास करतांना भारत सरकार आणि राज्य  सरकार यांनी कोविड -१९ संसर्गा संदर्भात वेळो वेळी दिलेल्या सूचनांचे पालन करणे बंधनकारक असेल.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Two more special trains for the convenience of passengers nanded news