नांदेड : पोक्सोमधील दोघेजण पोलिसांना शरण, सहा महिण्यापासून होते फरार

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 30 September 2020

या गुन्ह्यातील दोघेजण पोलिसांना चकमा देऊन जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र अटकपूर्व जामिन मिळत नसल्याने अखेर तब्बल सहा महिण्यानंतर ते पोलिसांना शरण आले.

नांदेड : भोकर तालुक्यातील नांदा शिवारातील एका आखाड्यावर राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलासोबत असभ्य वर्तन करून एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी भोकर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील दोघेजण पोलिसांना चकमा देऊन जामिन मिळविण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र अटकपूर्व जामिन मिळत नसल्याने अखेर तब्बल सहा महिण्यानंतर ते पोलिसांना शरण आले. भोकर पोलिसांनी त्यांना बुधवारी (ता. ३०) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविले आहे.  

भोकर तालुक्यातील एक महिला आपल्या सात वर्षीय आणि दीड वर्षीय मुलासोबत शेतातील आखाड्यावर वास्तव्यास होती. ता. १० मार्च २०२० रोजीच्या मध्यरात्री एकच्या सुमारास या प्रकरणातील पाच आरोपींनी संगणमत करून आखाड्यावरील महिलेच्या गळ्याला चाकु लावुन जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्या सात वर्षीय मुलासोबत असभ्य वर्तन करून मारहाण केली. एवढेच नाही तर सदर महिलेला शिविगाळ करुन धक्काबुक्की करुन तिचा विनयभंग केला. घरातील पाच हजार रुपये जबरीने चोरुन नेले. 

हेही वाचा  नांदेड- नागपूर रस्ता बनला मृत्यूचा सापळा, खड्डे आणि महामार्ग पोलिसांचा जाच

विविध गंभीर कलमान्वये होता गुन्हा दाखल

पीडित महिलेच्या फिर्यादीवरून भोकर तालुक्यातील नांदा येथील आरोपी गंगासागर कदम, हनुमंत कदम, मारोती वाघमारे व मोगले, एक अनोळखी आणि राजेश राहणार रेनापुर या पाच जणांविरुद्ध विनयभंग, अनैसर्गिक अत्याचार, जबरी चोरी व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी यापूर्वीच तिघांना अटक केली होती. मात्र गुन्हा दाखल झाला तेंव्हापासून हनुमंत कदम आणि राजेश चंद्रवंशी हे दोघेजण फरार होते. त्यांनी अटकपूर्व जामिन मिळावा म्हणून प्रयत्न केले. मात्र न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामिन दिला नाही. 

येथे क्लिक करा -  दुर्दैवी घटना : सख्ख्या दोन चुलत भावांचा डोहात बुडून मृत्यू -

एक आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत 

शेवटी हनुमंत कदम हा ता. २८ सप्टेंबर तर राजेश चंद्रवंशी ता. २९ सप्टेंबर रोजी भोकर पोलिसांना शरण आले. पोलिसांनी या दोघांनाही अटक करुन मंगळवारी (ता. २९) रोजी भोकर जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने दोघांनाही ता. एक आॅक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक शालिनी गजभारे करत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Two persons from Pokso surrendered to police and had been absconding for six months nanded news