esakal | नांदेड : दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटल घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सांगवी परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

नांदेड : दोन चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यामध्ये होत असलेल्या विविध गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी नांदेड पोलिस दलानी कंंर कसली आहे. गुन्हेगारांची आर्थीक नाडी बंद करण्यासाठी पोलिस सज्ज झाले आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटल घरफोडी करणाऱ्या दोन चोरट्यांना शुक्रवारी (ता. १८) सायंकाळी सांगवी परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून सव्वा दोन लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या दोन्ही चोरट्यांविरुद्ध शहरातल्या विविध पोलिस ठाण्यात घरफोडी, चोरीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहर व जिल्ह्यात विविध गुन्ह्यात वाढ झाली आहे. या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखआ आपल्या सर्वच पथकासह गस्त घालत आहे. या गुन्हेगारांना अटक करण्याच्या सुचना पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या. यावरुन ता. १८ डिसेंबर रोजी श्री चिखलीकर यांनी आपले विविध पथकांना गस्तीवर पाठवले.

हेही वाचा -  नांदेड : निर्यातक्षम फळे व भाजीपाला वाणांची शक्य / अशक्यता तपासणीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी -

यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन अटल घरफोडी करणारा चोरटा संजय पंडित नामनुर (वय २८) रा. गुंडलवाडी (ता. कळमनुरी, जिल्हा हिंगोली ) सध्या महेबुबनगर नांदेड हा त्याचा मित्र सांगवी भागातील अंबानगरमध्ये राहणाऱ्या डिंक्‍या उर्फ शंकर रमेश खांडेकर (वय २१) याच्या घरी जाणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सांगवी परिसरात सापळा लावून डिंक्‍या उर्फ शंकर खांडेकर यास आणि संजय नामनुर या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून सोन्या- चांदीचे एक लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, एक चाळीस हजार रुपये किमतीची दुचाकी, दोन हजार रुपयाचे दोन गॅस सिलेंडर, एलईडी टीव्ही, मंदिर चोरीतील नगदी तीन हजारआणि पाच मोबाईल असा दोन लाख २५ हजार८२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या दोन्ही चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. यातील संजय पंडित नामनुर (वय २८) याच्यावर घरफोडी व चोरीचे ५५ गुन्हे दाखल आहेत. तो विधीसंघर्ष बालकांना सोबत घेऊन शहरातील विविध भागात घरफोडी करत असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली. या पथकात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील नाईक, फौजदार प्रवीण राठोड, हवालदार गुंडेराव करले, अफजल पठाण, देविदास चव्हाण, रवी बाबर, संजीव जिंकलवाड, विठ्ठल शेळके, विलास कदम, गणेश धुमाळ, अर्जुन शिंदे आणि हेमंत बिचकेवार यांनी परिश्रम घेतले. या दोन्ही चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठवले आहे.