esakal | नांदेड : जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांगांनी काळा दिवस पाळत केला जिल्हा प्रशासनाचा निषेध
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन सर्व दिव्यांग संघटणांना सोबत घेऊन विद्रोही आंदोलन केले होते या आंदोलनाने संपूर्ण नांदेड शहर दणानुन गेले होते

नांदेड : जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांगांनी काळा दिवस पाळत केला जिल्हा प्रशासनाचा निषेध

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड :- जिल्हा परिषद नांदेड कडिल दिव्यांगांचा शासन निर्णयीत राखीव निधी गत अनेक वर्षांपासून खर्च न झाल्यामुळे तसेच दिव्यांग सुधारीत कायदा 2016 ची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, गतवर्षी मोठा गाजावाजा करून तपासणी शिबीरातील साहित्य वाटप करने.आमदार खासदार निधीतील दिव्यांगांचा निधी खर्च करणे.नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती/पंचायत समीत्यांकडिल दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणे.महानगरपालिका नांदेड आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका/नगरपरिषदा/नगरपंचायती यांच्या कडिल दिव्यांगांचा राखीव निधी खर्च करणे,लाॅकडाऊन काळात दिव्यांगांना दरमहा राशनकिट वितरीत करणे,बेरोजगार दिव्यांगांना घरकुल मिळने,अंत्योदय राशन कार्ड मिळने,थकित निराधार मानधन मिळने,स्वंय रोजगारासाठी गाळे/जागा उपलब्ध करून देणे.

नांदेड जिल्ह्यातील दिव्यांगांचा शासकीय रिक्त अणुशेष भरून काढणे, सर्व राष्ट्रीय कृत बॅंकाकडुन बेरोजगार दिव्यांगांना रोजगारासाठी कर्ज पुरवठा करणे,अपंग वित्त महामंडळाकडुन प्रलंबित सर्व प्रस्ताव निकाली काढत नव्याने प्रस्ताव मागविने दिव्यांगांना मारहाण करणाऱ्या रेल्वे पोलिसांना निलंबित करणे,यासह इतर मागण्यांच्या संदर्भात ता. 2 नोव्हेंबर 2020 रोजी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन सर्व दिव्यांग संघटणांना सोबत घेऊन विद्रोही आंदोलन केले होते या आंदोलनाने संपूर्ण नांदेड शहर दणानुन गेले होते. याची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाकडून एका महिन्यात मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले होते.

परंतु एक महिना पुर्ण झाला तरी मागण्यांची अंमलबजावणी केली नसल्यामुळे आज दि 3 डिसेंबर 2020 रोजी जागतिक दिव्यांग दिनी बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती नांदेड कडुन सर्व दिव्यांग संघटणांना सोबत घेऊन जिल्हा प्रशासन व लोकप्रतिनिधीं यांच्या उदासीन धोरणामुळे काळा दिवस पाळला गेला तसेच आक्रोश आंदोलन करत घोषणाबाजी करण्यात आली  आणि जिल्हा परिषदेसमोर तीन तास आक्रोश करत शिवोंची खुडची सुद्धा जप्त करण्याचा प्रयत्न केला गेला नंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलकर्णी यांनी आंदोलन स्थळी भेट दिली पण केवळ आश्वासच देऊ केला परंतु दिव्यांगांचे समाधान झाले नाही परत आक्रोशात बेरोजगार दिव्यांगांनी महानगरपालिका गाठली तीथे उपायुक्त भक्कड यांनी समाधान कारक आश्वासन दिले नंतर दिव्यांगांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हा प्रशासनाचा निषेध करत काळा दिवस पाळला.

या आंदोलनात जाहिर पाठिंब्यासह सहभागी भाजपा दिव्यांग आघाडी मुखेड, संभाजी ब्रिगेड दिव्यांग आघाडी नांदेड, ब्लाइंड संघर्ष समिती नांदेड, मुकबधीर कर्णबधिर संघटणा नांदेड,दिव्यांग वृद्ध निराधार मित्र मंडळ नांदेड आणि बेरोजगार दिव्यांग कल्याणकृती संघर्ष समीती हदगाव/मुदखेड/अर्धापूर/बिलोली/भोकर/देगलुर/नायगाव - नरसी/धर्माबाद-ऊमरी,किनवट/माहुर सहभागी झाले होते. आजच्या या आंदोलनात राहुल साळवे,

नागनाथ कामजळगे, देविदास बद्देवाड, अमरदिप गोधने,फेरोज खान महमद अली खान,प्रदिप गुबरे, विष्णु जायभाये, रवि कोकरे, कार्तिक भरतीपुरम, भोजराज शिंदे,नागोराव शिंदे, संभाजी सोनाळे.दत्तात्रय मंदेवाड,बालाजी ढोबळे,संजय धुलधाणी,सागर नरोड,शेषेराव वाघमारे,बालाजी आरळिकर,आनंदा माने,हरीकृष्ण भुसेवार.बबन खडसे,शिवराम कदम,नागनाथ गोंदले.मारोती मुठकरवार,मारोती फरांडे,व्यंकट कदम,गजानन इंगोले, राजकुमार देवकर, दादाराव वाघमारे,संजय सोनुले,विठ्ठल सुर्यवंशी,माधव शिरूळे,शेख आरीफ,शेख आतीक,मनोहर पंडित.प्रशांत हणमंते.सिद्धोधन गजभारे.राजु ईराबत्तीन, हणमंतराव राऊत,देवेंद्र खडसे,शेख रफिक, विकास साळवे,बालाजी कुरूडे, साहेबराव कदम,व्यंकटि सोनटक्के,शेख माजीद,बालाजी काकडे.गणेश वर्षेवार.ईबितवार. कापसिकर, बाबुराव वरळे, मसुद मुलाजी, पिंटु राजेगोरे,श्रेयल घोसकुलवाड, रावसाहेब माने, उत्तम घोंगरे, वैभव माळोदे, नागोराव कदम, विजय झगडे, शेख गौस, माधव बेरजे.पांडुरंग तांदळवाड,मुर्ताजी मुंगन.नागोरे, गणेश सुरोसे.मुकेश तामसकर, राहुल गिते, शिवशंकर माचापुरे. राहुल गिते, पुंढलिक गारोळे, संदेश घुगे, गजानन चव्हाण, कमलबाई आखाडे.बामणेताई. भाग्यश्री नागेश्वर, सविता गावटे, कल्पना सप्ते.पल्लवी लोणे, वनमाला दराडे.सुवर्णमाला पवार, कविता खाणसोळे इत्यादींसह शेकडो दिव्यांग सहभागी झाले होते.

loading image