esakal | नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार
sakal

बोलून बातमी शोधा

rain increase

नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बरबडा ( जिल्हा नांदेड ) : नायगाव तालुक्यातील मांजरम परिसरात सोमवारी दिवसभराच्या प्रचंड उकाड्यानंतर सायंकाळी अचानक आकाशात मेघ दाटून आले. पहाता पहाता वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास तासभर मेघ गर्जनेसह अवकाळी जोरदार पाऊस झाला. यातच हलक्या गारांच्या पावसाने उन्हाळी ज्वारीचे व कडब्याचे नुकसान झाले आहे. एवढेच नाही तर विज पडल्याने मांजरम येथील एका शेतकऱ्याची दुभती म्हैस व वासरु ठार झाले.

सोमवारी (ता. २६) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान अचानक आकाशात ढग जमा झाले. दिवसभरच्या प्रचंड उकाड्यामुळे मेघ गर्जनेसह पावसाला सुरुवात झाली. जवळपास एक तास जोरदार पाऊस झाला. यातच हलक्या गारा पडल्या. यातच सायंकाळी व सकाळी शेतीच्या मशागतीसाठी शिवारात असलेल्या व्यक्तींना अवकाळी पावसापेक्षा विजेच्या कडकडाटाची भिती वाटत होती.

हेही वाचा - नांदेड : निसर्गाचा चमत्कार; कडू लिंबाच्या झाडावर पिंपळ, वडाचे झाड

मांजरम येथील श्रीराम गणपतराव शिंदे यांच्या अखाड्यावर बांधलेली दुभती म्हैस व वासरु विज पडल्याने ठार झाले. तसेच हळद व उन्हाळी ज्वारीचे मोठे नुकसान झाले. कोरोनाच्या महामारीमुळे आगोदरच शेतकरी अडचणीत सापडला आहे. पुन्हा अवकाळी पावसामुळे दुहेरी संकट उभे राहीले आहे.जून महिना जवळ येत असल्याने शेतकरी उन्हाचे चटके खात शेताकडील मशागतीचे कामे सायंकाळपर्यंत करित असताना पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top