नांदेड - तीन दिवसात जिल्हाभरात ८५८ कर्मचाऱ्यांचे लसीकरण 

नांदेड - तीन दिवसात जिल्हाभरात ८५८ कर्मचाऱ्यांचे लसीकरण 

नांदेड - देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम शनिवारपासून (ता. १६) सुरु झाली आहे. मात्र, लसीकरणाच्या दुसऱ्या दिवशी यात खंड पडला होता. त्यानंतर मंगळवारपासून (ता. १९) पुन्हा लसीकरणाची सुरुवात झाली आहे. गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील पाच लसीकरण केंद्रावर दीड हजार लाभार्थ्यांपैकी ८५८ लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्यात आली आहे. 

पहिल्या टप्यात फ्रंट लाईनवर काम करणारे डॉक्टर, परिचारीका, ब्रदर्स, आशा, अंगणवाडी सेविका, लॅब टेक्निशियन अशा मोजक्या लोकांनाच ही लस देण्यात येत आहे. मात्र, अनेक लाभार्थ्यांना कोरोना लस घेतल्यानंतर ताप, डोके व अंग दुखणे यासाखे साईड इफेक्ट जाणवू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य विभाग लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांच्या सतत संपर्कात असून, लस दिलेल्या लाभार्थ्यास सौम्य प्रकारचे रिॲक्शन दिसत असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. 

लाभार्थ्यांना लसीचे सौम्य साईड इफेक्ट 

लसीकरणाच्या पहिल्या दिवशी सोमवारी लस दिलेल्या लाभार्थ्यांपैकी सात लाभार्थ्यांना हे लक्षण दिसत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी दिली होती. परंतु त्यानंतर मंगळवार आणि बुधवारी लस दिलेल्या लाभार्थ्यांपैकी नेमक्या किती लाभार्थ्यांना लसीचे सौम्य साईड इफेक्ट जाणवत आहेत. या बद्दल कुणीही सध्या बोलण्यास तयार नाही. 

पाच खासगी रुग्णालयात तातडीने उपचार सुविधा

कोरोना प्रतिबंधात्मक लस दिल्यानंतर अर्धा तासापर्यंत त्यांना तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवून नंतर घरी सोडण्यात येत आहे. लस दिल्याच्या अर्धा तासात किती लाभार्थ्यास त्याचे साईड इफेक्ट दिसून आले. याबद्दल सध्या माहिती दिली जात नाही. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्ह्यातील पाच खासगी रुग्णालयात संबंधित रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठीची सुविधा केली असली तरी घरी असलेल्या किंवा साईड इफेक्ट जाणवत असलेल्या रुग्णांपैकी किती रुग्णांस सौम्य व तीव्र स्वरुपाचे साईड इफेक्ट जाणवत आहेत. या बद्दलची परिपूर्ण माहिती तूर्त दिली जात नाही. 

फ्रंट लाईन कर्मचारी यांची आकडेवारी

 डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयाचे उप वैद्यकीय अधिक्षक आणि श्री गुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा रुग्णालय रुग्णालयाचे सहायक अधिष्ठाता या दोघांना ताप, डोके, अंगदुखीचे लक्षण असल्याने ते रुग्णालयाऐवजी घरीच आराम करत असल्याची माहिती मिळाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णाप्रमाणेच लसीकरण झालेल्या फ्रंट लाईन कर्मचारी यांची आकडेवारी आणि त्यांची स्थिती या बद्दल जिल्हा आरोग्य विभागाने माहिती प्रसिद्ध करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com