नांदेड : 'टरबुजातून' मिळाले पावणेदोन लाख

३० गुंठ्यांत घेतले पीक; वरूला येथील शेतकऱ्याची किमया
Nanded Varula farmer watermelon profit
Nanded Varula farmer watermelon profitsakal

निवघा बाजार : पारंपारीक शेतीला बगल देत वरुला (ता. हदगाव) येथील जितेंद्र मस्के या शेतकऱ्याने ३० गुंठ्यामध्ये टरबुजाचे पिक घेऊन अवघ्या तीन महिन्यात पावणे दोन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. त्यामुळे परीसरातील शेतकरी पारंपारिक शेतीला बगल देत नवनीवन पिके घेऊन उत्पन्न वाढीवर भर देताना दिसून येत आहेत.

मागील वर्षी परीसरात ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा बहुतांश शेतकऱ्यांनी टरबूज पिक घेतले. टरबुजाचे उत्पन्न पण अपेक्षाप्रमाणे झाले. परंतू कोरोना व लॉकडाउन असल्यामुळे टरबुज पिकाला विक्रीकरीता बाजारपेठ मिळाली नाही. त्यामुळे अनेकांची टरबुज विक्री अभावी शेतात सडली तर बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील टरबुज काढून रस्त्यावर फेकून दिली तर अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे टरबुज पिकांचे नुकसान झाले होते. त्यामुळे टरबुज लागवडीसाठी लागलेला खर्च पण निघाला नाही. या मुळे परीसरात या वर्षी टरबुज कमी प्रमाणावर घेण्यात आले.

या वर्षी वरुला येथील शेतकरी जितेंद्र मस्के यांनी हिम्मत करून त्यांनी ३० गुंठे क्षेत्रात फेब्रुवारी महिण्यात टरबुज पिकाची लागवड केली. त्यामुळे त्यांचे पीक काढणीस लवकर आले तर योगायोगाने टरबुज काढणीच्या वेळात रमजान महिना सुरु झाल्याने टरबुजाला मागणी वाढली व भाव पण चांगला मिळाला. पावणे दोन लाख रुपयांची टरबुजाची विक्री झाली. सुरुवातीपासून शेवटपर्यंत ६० हजार रुपये लागवड खर्च आला असून निव्वळ नफा एक लाख १५ हजार रुपये झाल्याचे जितेंद्र मस्के यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com