nanded: पाणी पाळ्यांचे काटेकोर नियोजन हवे : चव्हाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अशोक चव्हाण
पाणी पाळ्यांचे काटेकोर नियोजन हवे

पाणी पाळ्यांचे काटेकोर नियोजन हवे : चव्हाण

नांदेड : ‘‘जिल्ह्यातील सिंचनासाठी आवश्यक शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प, पूर्णा प्रकल्प, निम्न मानार प्रकल्प आणि ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातील पाणी कालव्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी पाणी नाही त्याठिकाणी पोचविण्यासाठी अधिक जबाबदारीचे नियोजन आवश्यक आहे,’’ असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी केले.

डॉ. शंकरराव चव्हाण जिल्हा नियोजन सभागृहात सोमवारी (ता. २२) कालवा सल्लागार समितीची बैठक त्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ‘जि.प’च्या अध्यक्षा मंगाराणी आंबुलगेकर, खासदार हेमंत पाटील, आमदार अमर राजूरकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार मोहन हंबर्डे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार राजु नवघरे, जिल्हाधिकारी डॉ. विपिन, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता बी. के. शेटे आदी उपस्थित होते.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

पूर्णा प्रकल्पात येलदरी व सिद्धेश्वर दोन धरणातून सिंचनासाठी ५८५.८२ दलघमी पाणी उपलब्ध आहे. या पाण्यातून सुमारे ५९ हजार ५०० हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्याचे नियोजन केले आहे.
निम्न मनार या प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. यातून सिंचनासाठी ९४.६८ दलघमी पाणी उपलब्ध झाले. या पाण्यातून सुमारे १७ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन, तर उन्हाळी हंगामात तीन आवर्तने दिली जातील. ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पात यावर्षी ९६४.१० दलघमी पाणी आहे. सिंचनासाठी ७२२.६६ दलघमी पाणी झाले आहे. त्यातून ७८ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या व उन्हाळी हंगामात चार पाणी पाळ्यांचे नियोजन केले आहे.

शंकररावजी चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात शंभर टक्के (८०.७९ दलघमी) पाणी आहे. यावर्षी पहिल्यांदाच अंतेश्वर बॅरेज भरले. त्यातून २१.१० दलघमी व दिग्रस बंधाऱ्यातून २४.० दलघमी पाणी मिळेल. असे एकूण १२५.९५ दलघमी पाणी उपलब्ध होईल. यातून बाष्पीभवन १६.३२ दलघमी वजा करता १०९.६३ दलघमी पाणी वापरासाठी मिळेल. पिण्यासाठी नांदेड महानगरपालिका, एमआयडीसी व ग्रामीण भागासाठी ३९.३७ दलघमी पाणी आरक्षित केले आहे. त्यामुळे सिंचनासाठी ७०.२६ दलघमी पाणी आहे. यामुळे १५ हजार हेक्टर शेतीच्या सिंचनासाठी रब्बी हंगामात तीन पाणी पाळ्या मिळतील, असे सांगण्यात आले.

loading image
go to top