
नांदेड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच
नांदेड - गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा संततधार पाऊस होत आहे. शनिवारी रात्री सुरु झालेला पाऊस दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारपर्यंत सुरुच होता. पाण्याची आवक वाढत असल्याने विष्णुपुरी प्रकल्पाचा एक दरवाजा सकाळी साडेसहा वाजता उघडण्यात आला. जिल्ह्यात गत २४ तासात सरासरी ११.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. आठवड्यापूर्वी जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अनेक गावात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. यानंतर पावसाने काही विश्रांती घेत पुन्हा हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसापासून पुन्हा संततधार पाऊस सुरु झाला आहे. शनिवारी दिवसभर पावसाची रिमझिम सुरु झाली.
यानंतर काहिशी विश्रांती घेत रात्रीपासून संततधार पाऊस रविवारी सायंकाळपर्यंत सुरुच होता. मात्र दुपारनंदर पावसाने उघडीप दिली होती. परिणामी विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात पाण्याची आवक वाढत असल्याने प्रकल्पाचा एक दरवाजा रविवारी सकाळी उघडण्यात आला असून, गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.
गत २४ तासांत सरासरी ११.९० मि.मी. पाऊस
जिल्ह्यात रविवार (२४) सकाळी ८.२० वाजता संपलेल्या गत २४ तासात सरासरी ११.९० मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ६८३.१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात रविवार सकाळी संपलेल्या गत २४ तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे आहे. कंसात एकूण पाऊस : नांदेड- १४.९० (६५३.४०), बिलोली-७.८० (७०८.८०), मुखेड- ४.९० (६३७), कंधार-८.४० (६५५.२०), लोहा-१७ (६२०.२०), हदगाव-१३ (६२३.१०), भोकर- १३.६० (७८९.३०), देगलूर-२.८० (६०२.९०), किनवट-१५.८० (७२६.७०), मुदखेड- १४ (८४७.५०), हिमायतनगर-१३.३० (९०२.२०), माहूर- १२.८० (६०२.९०), धर्माबाद-१२.१० (७३०.७०), उमरी- १८.४० (८४३.६०), अर्धापूर- २० (६४१.८०), नायगाव- ११.६० (६२३.३०) मिलीमीटर आहे.
Web Title: Nanded Weather Updates Continues Rain Vishnupuri Project One Door Opened
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..