Nanded : पाणी पुरवठा योजनेचे काम कासवगतीने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी पुरवठा

Nanded : पाणी पुरवठा योजनेचे काम कासवगतीने

हिमायतनगर : शहरात गेल्या तिन वर्षांपासून पाणी पुरवठा योजनेचे काम अतिशय कासवगतीने सुरू आहे. पाणी पुरवठा पाइपलाइन टाकण्यासाठी रस्ते खोदून ठेवले असून पावसाचे पाणी या खोदलेल्या रस्त्यावर साचून रस्ते चिखलमय झाले असल्याने शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

हेही वाचा: Nanded : आगामी काळात नांदेड शहर विकासात ठरेल अव्वल

हिमायतनगर नगरपंचायत अस्तित्वात आल्यानंतर शहरांचा कायमस्वरूपी पाणी टंचाईचा प्रश्न सोडविण्यासाठी तालुक्याचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रयत्नातून १९ कोटी रूपयांची प्रभावी पाणीपुरवठा योजना मंजूर झाली. सदर काम हे एका बाहेर जिल्ह्यातील गुत्तेदारामार्फत करण्यात येत आहे.

हेही वाचा: Nanded : ‘भाऊराव’ ने शेतकऱ्यांचे हित साधले

सदर कामावर प्रशासनाची मेहेरनजर असल्यामुळे गेल्या तिन वर्षांपासून अतिशय कासवगतीने काम चालू आहे. शहरात काही भागात पाइपलाइनचे पाईप टाकण्यासाठी रस्ते खोदकाम केले आहेत. सदर ठिकाणी खोदून ठेवलेल्या ठिकाणी पावसाच्या पाण्याने चिखल झाला असून परिणामी नागरीकांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा: Nanded : भाऊराव कारखान्याची निवडणूक बिनविरोध

शासनाने ठरवून दिलेला काम पुर्ण करण्याचा अवधी केव्हाच संपला असून काम आजही अर्धवट अवस्थेत आहे. उन्हाळ्यात नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागली. येणाऱ्या उन्हाळ्यात तरी नागरीकांना नळ योजनेचे पाणी मिळते की, नाही याची शाश्वती देणे ही कठीणच आहे. ठेकेदारांच्या मनमानी कारभाराला शहरातील जनता वैतागली आहे.

हेही वाचा: Nanded : कुटुंब शस्त्रक्रिया सुरू असतानाच विद्युत पुरवठा खंडित

त्यामुळे नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या बाबींकडे लक्ष वेधून मनमानी कारभार चालवून शहरवाशीयांच्या भावनेशी खेळ चालविलेल्या ठेकेदारावर कामाच्या दिरंगाईबद्दल कायदेशीर करूण उन्हाळ्यापुर्वी काम पुर्ण करण्याची सक्त ताकीद द्यावी. अशी मागणी शहरवाशीयातुन पुढे आली आहे.