नांदेड - दुसऱ्यांदा लॉकडाउन झाल्यास कामगारांना उपसमारीची भीती 

शिवचरण वावळे
Sunday, 22 November 2020

कोरोना हे संबंध जगावर ओढवलेले सर्वात मोठे संकट आहे. यात महामारी सोबतच देशाची अर्थिक प्रगतीला ब्रेक लागण्यासोबतच भुकमारी सारखी परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागमार नाही. त्यामुळे कुठल्याही समाज वर्गास याची झळ बसूनये म्हणून सरकारला काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागत आहेत आणि यापुढे देखील सरकारला असेच निर्णय घ्यावे लागणार आहेत.

नांदेड - देशात पहिल्यांदा लॉकडाउन झाले आणि लहान मोठे उद्योग, व्यवसाय बंद ठेवण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला. दरम्यान तळहतावर पोट असणाऱ्या हजारो कामगारांच्या नौकऱ्या गेल्या. परिणामी त्यांच्या कुटुंबावर उपसमारीची वेळ येऊन ठेपली होती. मात्र शासनासोबतच अनेक स्वंयसेवी संस्था, संघटना पुढाकार घेत त्यांना अन्न धान्यांच्या किट तयार करुन घरपोच दिल्या. परंतु पुन्हा लॉकडाउन झाल्यास उपासमारीची वेळ येईल अशी भिती कामगारांना वाटू लागली आहे. 

पहिल्या लॉकडाउन दरम्यान अनेकांनी जमेल त्या स्वरूपात गरजवंत जनतेची सेवा केली. मात्र दुसऱ्यांदा लॉकडाउन झाल्यास तळहातावर पोट असणाऱ्या कष्टकरी जनतेला मात्र हाताला काम नसल्यास कुटुंबाचे होणारे हाल डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळेच त्यांना दुसऱ्या लॉकडाउनची भिती वाटत आहे. दिवळीनंतर देशात कोरोनाची दुसरी लाट येऊ घातली आहे. दिवसेंदिवस पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत भर पडत आहे. त्यामुळे राज्य पातळीवर विमान आणि रेल्वेसेवा बंद करण्याच्या चर्चेला उधान आले आहे. 

हेही वाचा- नांदेड जिल्हा २० हजार पार, रविवारी ८५ जण पॉझिटिव्ह, २५ रुग्ण कोरोनामुक्त

शहराकडे वळलेल्या बरोजगारांसमोर उपासमारी होईल का?

मुंबई सारख्या शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्यास सरकारला नाविलाजाने पुन्हा कडक लॉकडाउन करावे लागेल असे स्पस्ट चित्र दिसत आहे. पुन्हा लॉकडाउन झाल्यास हमाल, बांधकाम मजूर, स्थलांतरीत मजूर, ऊसतोड कामगार, घरापासून दूर असलेले मोल मजुरी करणारे कुटुंब आणि नौकरीच्या आशेनी पुन्हा शहराकडे वळलेल्या बरोजगारांसमोर उपासमारी दिसत आहे. 

हेही वाचले पाहिजे- नांदेड : अर्ज मागे घेण्यासाठी खंडणी स्विकारतांना एकाला रंगेहात पकडले​

सरकराने लॉकडाउनपूर्वी कामगारांच्या पोटा-पाण्याची सोय करावी

रोजंदारीवर काम करणारा कष्टकरी वर्ग आता कुठे लॉकडाउन मधून सावरत आहे. दिवाळीनंतर लॉकडाउन होण्याची दाट शक्यता वाटत आहे. मात्र सरकराने लॉकडाउन करण्यापूर्वी तळहातावर पोट असणाऱ्या कामगारांच्या पोटा-पाण्याची सोय करावी आणि मगच खुशाल लॉकडाउन करावे अन्यथा कामगार आणि त्याच्या कुटुबांवर कोरोना येईल तेव्हा येईल मात्र उपसामारीने मरण्याची वेळ लवक येईल इतके नक्की. 
- भुजंग कसबे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED: Workers fear submarine in case of second lockdown Nanded News