esakal | नांदेडची चिंता वाढली : शनिवारी ८३ रुग्ण बाधित, दोघांचा मृत्यू, संख्या १२५२ वर पोहचली
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

ता. २४ जुलै मुक्रमाबाद येथील ६५ वर्षीय महिला आणि शनिवारी (ता. २५) खय्युम प्लाॅट, खोजा काॅलनी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

नांदेडची चिंता वाढली : शनिवारी ८३ रुग्ण बाधित, दोघांचा मृत्यू, संख्या १२५२ वर पोहचली

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्ह्यात शनिवार (ता. २५) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ८३ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज १९ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २४ जुलैमुक्रमाबाद येथील ६५ वर्षीय महिाल आणि शनिवारी (ता. २५) खय्युम प्लाॅट, खोजा काॅलनी येथील ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपूरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६३ एवढी झाली आहे. यात ५६ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ४४५ अहवालापैकी ३२७ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार २५२ एवढी झाली आहे. यातील ६७२ एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ५१३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १० बाधितांची संख्या गंभीर स्वरुपाची आहे. यात चार महिला व सहा पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या १९ बाधितांमध्ये कै. डाॅ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी चार, जिल्हा रुग्णालय दोन, खासगी रुग्णालयातील १३ बाधिताचा यात समावेश आहे.

हेही वाचाबापरे : नांदेड जिल्ह्यात कंटेनमेंट झोनची एवढी संख्या...?

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील तरोडा नाका एक, माणिकनगर एक, वजिराबाद पाच, देगलूर नाका दोन, पूर्णा रोड एक, सिंधी काॅलनी दोन, भावसार चौक दोन, नविन कौठा एक, राजनगर एक, गुजराती शाळा दोन, काबरानगर दोन, दत्तनगर एक, शहाजीनगर मालेगाव रोड दोन, हडको दहा, नेरली एक, लिंबगाव ता. नांदेड एक, भोकर एक, बामणी ता. हदगाव एक, तामसा ता. हदगाव एक, शिवाजीनगर मुखेड एक, मेन मार्केट मुखेड सहा, वडगाव ता. मुखेड चार, धोबी गल्ली मुखेड एक, फुलेनगर मुखेड दोन, जाहूर ता. मुखेड एक, अंबुलगा ता. मुखेड तीन, अहिल्याबाई होळकरनगर मुखेड पाच, मुखेड शहर एक, मुक्रमाबाद पाच, गोकुळनगर देगलूर तीन, सुगाव ता. देगलूर एक, भोईगल्ली देगलूर एक, लाईन गल्ली देगलूर एक, कृषी विभाग बिलोली एक, देशमुख नगर बिलोली एक, चव्हाणगल्ली नायगाव एक, धर्माबाद शहर एक, बालाजी गल्ली धर्माबाद पाच, मोंढा मार्केट उमरी एक. 

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ५१३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे ९८, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे १८४, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १२, जिल्हा रुग्णालय येथे २९, बिलोली कोविड केअर सेंटर येथे पाच, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ६१, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ३२, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर तीन, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे एक, लोहा कोविड केअर सेंटर येथे १०, कंधार कोविड केअर सेंटर येथे १०, भोकर एक, धर्माबाद पाच, खाजगी रुग्णालयात ४५ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक करा राम मंदीर शिलान्यासासाठी गोदावरीचे जल आणि माती- विहिंप

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ५०५
घेतलेले स्वॅब- ११ हजार ९९९
निगेटिव्ह स्वॅब- ९ हजार ६५३
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ८३
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १२५२
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-३०
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-४
मृत्यू संख्या- ६३ (जिल्ह्यातील ५६ तर बाहेर जिल्ह्यातील सात)
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ६७२,
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ५१३
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २७०.