नांदेडची चिंता कायम : ‘ते’ चार पॉझिटीव्ह रुग्ण बेपत्ताच

file photo
file photo

नांदेड : येथील लंगरसाहिब गुरूद्वारामधील कोरोना बाधीत आढळलेले ती चार जण अद्यापही बेपत्ता अहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे. दरम्यान बुधवारी (ता. सहा) एका ५६ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. वजिराबाद पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. पाच) पहाटे गुन्हा दाखल झाला मात्र ते चार जण अद्याप सापडले नसल्याने नांदेडकरांची चिंता वाढली आहे.  

कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने सुरवातीला लॉकडाउनमध्ये वाखान्‍याजोगे काम केले. मात्र हळूहळू त्यात ढीलाई दिल्याने कोरोनाचे रुग्ण आढळुन लागले. शहर व जिल्हा २० एप्रिलपर्यंत ग्रीन झोनमध्ये होता. त्यानंतर नांदेडमधील पीरबुऱ्हाण नगर भागातून एक ६४ वर्षीय व्यक्तीला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आला. त्यानंतर २८ रोजी सेलूची त्यानंतर रहमतनगर येथील महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले. पुन्हा बुधवारी (ता. सहा) अबचलनगर भागातील एक ५६ वर्षीय व्यक्तीचा अशा चार जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर पंजाब येथे यात्रेकरूंना सोडण्यासाठी गेलेल्या चार चालकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. 

वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल 

दरम्यान नांदेड येथून पंजाब येथे गेलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याची ओरड होत आहे. पंजाब सरकारकडून महाराष्ट्र सरकारला रोज आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. तेथील आरोग्यमंत्री ही आपल्या सरकारचा निषेध नोंदवित असून नुकसानाची दावा ठोकण्याची भाषा बोलू लागले आहेत. तर दुसरीकडे शनिवारी (ता. दोन) ज्या वीस जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले, अशांना अहवाल येईपर्यंत नजरकैदेत ठेवणे अपेक्षीत होते. त्या वीसच्या वीस जणांना सोडून प्रशासन मोकळे झाले. यातील कोरोना बाधीत असलेले चार जण अद्याप सापडले नाहीत. अखेर जिल्हा प्रशासनाच्या आदेशावरुन महापालिकेचे प्रयोग शाळा तंत्रज्ञ सुदर्शन गंगाराम आदमनवार (वय ३९) यांच्या फिर्यादीवरुन वजिराबाद पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील पुंगळे करत आहेत. 

‘त्या’ चार जणांना पकडण्यासाठी प्रशासनाची कसरत

शहरातून कोरोनाबाधीत चार जण बेपत्ता झाल्याने त्यांना शोधून काढून त्यांच्यावर उपचार करणे हे मोठे आव्हान पोलिस व जिल्हा प्रशासनासमोर आहे. गुरूद्वारा, लंगरसाहिब, शहरातील विविद गुरुद्वारे, गर्दीचा परिसर, वजिराबाद, चिखलवाडी यासह आदी परिसरात त्या चार जणांचा शोध सुरू आहे. कुणालाही काही याबाबत माहिती मिलाल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com