Nanded Crime: नांदेडच्या युवकाचा पुण्यात खून; लाकडी दांडके व स्टील पाइपने मारहाण
Nanded News: नांदेडच्या चैतन्यनगरचा ३४ वर्षीय सिद्दीकी मोहम्मद मुजम्मील मोहम्मद हाजी यांना पुण्यातील कारेगाव येथील किरकोळ वादानंतर झालेल्या मारहाणीत डोक्यावर गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाला. त्यांचा भाऊ शकील मोहम्मद गंभीर जखमी असून शिरूर येथील श्री गणेशा मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
नांदेड : नांदेडच्या चैतन्यनगर भागातील तरुणाचा पुण्यातील शिरूर तालुक्यातील कारेगाव येथे किरकोळ वादातून खून झाल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन) रात्री दहाच्या सुमारास पुण्यातील कारेगाव येथील यशईन चौकात घडली.