नांदेड जिल्हा परिषदेत ३३ कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Zilla Parishad 33 employees Re appointment

नांदेड जिल्हा परिषदेत ३३ कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती

नांदेड : जिल्हा परिषदेतंर्गत ३३ अनुकंपा कर्मचाऱ्यांना वर्ग- चारच्या पदावरून वर्ग - तीन पदावर बुधवारी फेरनियुक्तीचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. यावेळी अनुकंपा कर्मचाऱ्यांना पदोन्नती दिल्याबद्दल कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांचा सत्कार करून प्रशासनाचे आभार मानले.

यापूर्वी जिल्हा परिषदेमध्ये सदर कर्मचाऱ्यांना परिचर वर्ग चार म्हणून नियुक्त्या देण्यात आल्या होत्या. आता वर्ग तीन प्रवर्गातील रिक्त झालेल्या पदांवर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ३३ कर्मचाऱ्यांना फेरनियुक्तीने नेमणुका देण्यात आल्या आहेत. यात अंगणवाडी पर्यवेक्षिकापदी एक, वरिष्ठ सहाय्यक - चार, कनिष्ठ सहाय्यक -१८, वरिष्ठ सहाय्यक लेखा - दोन, कनिष्ठ सहाय्यक लेखा - सहा तर आरोग्य सेवकपदी दोन अशा एकूण ३३ कर्मचाऱ्यांना ठाकूर - घुगे यांच्या हस्ते फेर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत.

यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, डॉ. नामदेव केंद्रे, व्ही. आर. पाटील यांच्यासह सर्व खातेप्रमुख यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर - घुगे ह्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव पाठपुरावा करत असतात. त्यांचा पाठपुराव्यामुळेच आज ३३ अनुकंपा कर्मचाऱ्यांना फेरनियुक्तीने पदोन्नत्या मिळाल्या आहेत. अनुकंपा कर्मचाऱ्यांना फेरनियुक्ती देण्यामध्ये जिल्हा परिषदेमधील ही ऐतिहासिक घटना असल्याचे मत जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे बाबुराव पुजरवाड यांनी व्यक्त केले. प्रशासनाने पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांना फेरनियुक्त दिल्याबद्दल जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेच्या वतीने ठाकूर-घुगे यांचे पुजरवाड यांनी आभार मानले.

अनुकंपांमधून आपल्याला शासकीय सेवेत सेवा करण्याची संधी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून नाव कमवावे. कामाप्रती चोखंदळ राहून चांगल्या कामातून लौकिक मिळवावा.

- वर्षा ठाकूर- घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी.

Web Title: Nanded Zilla Parishad 33 Employees Re Appointment Ceo Varsha Thakur Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..