
नांदेड : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका
कंधार : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वबळावर व पूर्ण ताकतीनिशी लढवणार असल्याचे सुतोवाच युवानेते विक्रांत शिंदे यांनी हाळदा येथील कार्यकर्ता बैठकीत केले. कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.
कंधार तालुक्यातील कौठा व बारूळ गटाच्या कार्यकर्त्यांच्यावतीने हाळदा येथे विशेष बैठक पार पडली. आमदार श्यामसुंदर शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कौठा व बारूळ गटातील आमदार समर्थकांनी युवा नेते विक्रांत शिंदे यांनी कौठा- बारूळ गटातून जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्ण ताकतीनिशी लढवावी असा आग्रह केला.
कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव विक्रांत शिंदे यांनी कौठा-बारूळ गतामधून जिल्हा परिषदेची निवडणूक पूर्ण ताकतिनिशी लढवणार असल्याचे जाहीर करून मतदारसंघातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्व जागा पूर्ण ताकदीनिशी लढवणार असल्याचे कार्यकर्ता मेळाव्यात स्पष्ट केले.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी कंधार-लोहा मतदारसंघातील सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहून जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या सर्व जागेवर विजय संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन केले. या वेळी आमदार श्यामसुंदर शिंदे, रोहित पाटील शिंदे, अरुण पाटील कदम, शेकापचे जिल्हाध्यक्ष योगेश नंदनवनकर, बाळू पानपट्टे, दत्ता पाटील कौसल्ये, रणजित पाटील, हौसाजी कांबळे, सलाम साहेब, गंगाधर चिखलीकर, सरपंच हणमंत कदम, प्रफुल येरावार यांच्यासह सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच, कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
Web Title: Nanded Zilla Parishad Panchayat Samiti Elections Independent Candidate
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..