नांदेड जिल्हा परिषदेचे वरातीमागून घोडे, बुधवारी सर्वांची अॅन्टीजेन तपासणी

प्रल्हाद कांबळे
Tuesday, 1 September 2020

मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत.

नांदेड : जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांच्यासह अनेकांना कोरोनाची लागन झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये एकच खळबळ उडाली.  त्यानंतर प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी शरद कुलकर्णी यांनी बुधवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेमधील सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात येणार आहेत. तीन आठवड्यांपूर्वी स्थायी समितीच्या बैठकीत ठरल्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांची ची टेस्ट करण्याच्या निर्णयाला अखेर बुधवाराचा मुहूर्त मिळाला.

जिल्हा परिषद मुख्यालयातील सर्वांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर स्थायी समितीने घेतलेल्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी होण्याची गरज असताना, अत्यावश्यक असलेल्या या तपासणीसाठी तब्बल वीस दिवसांचा वेळ लागला. दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांसह खुद्द जिल्हाधिकारीच कोरोना बाधीत झाल्याने एकच खळबळ उडाली.  कोरोनाची लागण झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या जिल्हा परिषद प्रशासनाने बुधवारी (ता. दोन) जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचे पत्र काढून संबंधित कर्मचाऱ्यांनी आधारकार्डसह हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

हेही वाचानांदेड जिल्हाधिकारी डॉ.विपिन यांना कोरोनाची बाधा -

जिल्हा परिषदेतील कारभार सैरभैर 

जिल्हा परिषदेतील कारभार सैरभैर झाला आहे. साधारण आता तीन आठवड्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेमध्ये कोरोना विषयी चर्चा झाली तेव्हा जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची अॅन्टीजेन टेस्ट करण्याचा विचार समोर आला. यानुसार या सभेत यासंबंधीचा ठराव घेण्यात आला. जिल्हा परिषदेतील काही माजी पदाधिकारी तथा विद्यमान सदस्य आणि अधिकारी व कर्मचाऱ्यांना पैकी काहीजणांना कोरोना संक्रमण झाले असेल तर त्यावर तातडीने उपचार करून कोरोना साखळी तोडली जाईल असा या निर्णया मागचा उद्देश होता. तेव्हा स्थायी समितीच्या सभेत झालेला हा निर्णय नंतर मात्र फायलीत दडून बसला.

जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा टक्का वाढत असताना

त्यामुळे तपासणीचा निर्णय घेऊन जिल्हा परिषद विसरून गेली असावी अशी चर्चा झाली. या निर्णयानंतर तिसरा आठवडा आला असतानाही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सरसकट तपासणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. या विलंबामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर काही जणांना कोरोना संक्रमणे झाली. जिल्ह्यात कोरोना संक्रमणाचा टक्का वाढत असताना आता मात्र जिल्हा परिषद खडबडून जागी झाली आहे. जिल्हा परिषदेच्या प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घातले असून बुधावारी तपासणीचा मुहूर्त निश्चित केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Zilla Parishad show, antigen test of all on Wednesday nanded news