esakal | नांदेडकरांनो सावधान : रुग्णवाहिकेतून रुग्णाप्रमाणेच ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक; कोरोनाची दाहकता

बोलून बातमी शोधा

रुग्णवाहिका
नांदेडकरांनो सावधान : रुग्णवाहिकेतून रुग्णाप्रमाणेच ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक; कोरोनाची दाहकता
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासह संबंध देशभरात हाहाकार पसरला आहे. रुग्णवाहिका रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी सतत रस्त्यावर असतात. रुग्णवाहिकेचे सायरन कानावर पडताच गंभीर रुग्णाला उपचार वेळेत मिळावेत म्हणून अन्य वाहने पाठीमागून येणाऱ्या रुग्णवाहिकेला रस्ता मोकळा करुन देतात. परंतु आता चक्क नांदेडमधून रुग्णांची तर वाहतुक होत आहेच. त्याशिवाय ऑक्सीजन सिलेंडर वाहतूक करणारी रुग्णवाहिका अनेकांचे लक्ष वेधत आहे. या भीषण परिस्थितीमुळे कोरोनाचा संसर्ग किती भयावह आहे याचे जिवंत उदाहरण पहावयास मिळते.

नांदेड जिल्ह्यात व शहरात कोरोनाचा उद्रेक झपाट्याने वाढत आहे. त्याच गतीने मृत्यूंची संख्याही त्याच गतीने पुढे सरकत आहे. शहराच्या मुख्य स्मशानभूमीमध्ये मृतदेहांना वेटिंगवर राहावे लागत आहे. हे चित्र विदारक असले तरी वस्तुस्थिती खरी आहे. पूर्वी रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी रुग्णवाहिका काम करत होती व आताही करत असते. परंतु सध्या कोरोनाची लाट सुरु असल्याने रस्त्यावरुन सर्वात जास्त रुग्णवाहिकाच धावत असताना पहावयास मिळत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजनचे प्रमाण कमी पडत असल्याने प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. आॅक्सीजनशिवाय रुग्णाचा बळी जाऊ नये यासाठी जिल्हाप्रशासन काळजी घेत आहे.

हेही वाचा - जागतीक वसुंधरा दिन : ओसाड पडतेय वसुंधरा; झाडांच्या बेसुमार कत्तली ः पाण्याचा अपव्यय आणि वायुप्रदूषणही

नियमाचे नागरिकांनी पालन करावे- प्रशासन

शहरातील काही रुग्णवाहिकेतून ऑक्सीजन सिलेंडरची वाहतूक करण्यात येत आहे. हा प्रसंग डोळ्यासमोर येताच कोणरोनाची दहाकता किती तिव्र आहे हे लक्षात येते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने कोरोनावर प्रतिबंध बसावा यासाठी शुक्रवार (ता. 23) एप्रिलपासून जिल्ह्यात कडक लॅाकडाऊनची अंमलबजावणी करण्यात येत आहे. जागोजागी पोलिसांची नाका-बंदी, महसुल, महापालिकेचे पथक शहरातील व्यापाऱ्यांचा मिळणारा प्रतिसाद यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात कोरोनावर मात केल्या जाईल असा विश्वास प्रशासनातून व्यक्त होत आहे. परंतु नांदेडकरांनी प्रशासनाच्या व लॅाकाडाऊनच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर, पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे आणि महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी केले आहे.