esakal | नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी

बोलून बातमी शोधा

नांदेड - कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सोमवारी माहिती दिली. 

कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, महापालिका तसेच अन्न व औषध विभाग यांच्यासह इतर विभागाच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलिस विभागाने देखील विविध चौकात आणि मुख्य रस्ते आणि नाक्यावर बंदोबस्त ठेवला आहे. आता नागरिकांनी देखील आपआपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी केले. 

नांदेडकरांनो...विनाकारण रस्त्यावर फिरून जीव धोक्यात घालू नका - विशेष पोलिस महानिरीक्षक तांबोळी
sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड - कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत असल्यामुळे आता सावध राहण्याची गरज असून नागरिकांनी देखील आपले आणि आपल्या कुटुंबासह मित्र, नातेवाईकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि विनाकारण रस्त्यावर येऊ नये, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी सोमवारी (ता. १२) केले आहे.
 
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर श्री. तांबोळी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. आरोग्य विभाग, महापालिका तसेच अन्न व औषध विभाग यांच्यासह इतर विभागाच्या मदतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. पोलिस विभागाने देखील विविध चौकात आणि मुख्य रस्ते आणि नाक्यावर बंदोबस्त ठेवला आहे. आता नागरिकांनी देखील आपआपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. तांबोळी यांनी यावेळी केले. 

हेही वाचा - प्रत्येक कोरोना बाधितांना रेमडेसिवीरची आवश्यकता नाही- जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर

३२५ पोलिस अधिकारी, कर्मचारी बाधित 
कोरोना संसर्ग वाढत असून परिक्षेत्रातील जवळपास ३२५ पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. एकीकडे बंदोबस्ताचे काम करत असताना दुसरीकडे पोलिसांना देखील कोरोना संसर्गाचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर काही जण दोनदा कोरोनाबाधित झाले आहेत तर काही जणांवर उपचारही चालू आहेत. त्यामुळे नागरिकांनी देखील कोरोनाचे संकट आवाक्याबाहेर जाणार नाही, याची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन श्री. तांबोळी यांनी केले. 

हेही वाचलेच पाहिजे - हिंगोलीत सर्व बाजारपेठ सुरु, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ऍग्रिकल्चरचा पुढाकार

प्रशासनाला सहकार्य करा
वाढता कोरोना संसर्ग रोखायचा असेल तर शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. नियमित हात धुवा, मास्क वापरा, सोशल डिस्टिन्सिंग पाळा. त्याचबरोबर कोरोनाची प्रतिबंधात्मक लस घ्यावी. आपला समाज आणि देश कोरोनामुक्त करायचा असेल तर प्रत्येकाने जबाबदारीने आपली आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी. त्या शिवाय कोरोना संसर्ग आटोक्यात येणार नाही. त्यामुळे प्रत्येकाने आपआपली जबाबदारी ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे. कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहनही विशेष पोलिस महानिरीक्षक निसार तांबोळी आणि पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.