नांदेडची चिंता कायम:  सोमवारी पुन्हा ६६ रुग्णांची भर, दोघांचा मृत्यू, संख्या पोहचली १३९४ वर  

प्रल्हाद कांबळे
Monday, 27 July 2020

ता. २६ जुलै रोजी कौसरनगर, चुना भट्टी परिसरातील ३६ वर्षीय महिला आणि शहापूर ता.देगलूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

नांदेड : जिल्ह्यात सोमवार (ता. २७) जुलै रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंतच्या अहवालानुसार ६६ व्यक्ती बाधित झाले. जिल्ह्यातील आज ४७ व्यक्ती बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. ता. २६ जुलै रोजी कौसरनगर, चुना भट्टी परिसरातील ३६ वर्षीय महिला आणि शहापूर ता.देगलूर येथील ६५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. यांच्यावर शासकिय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी, नांदेड रुग्णालयात उपचार सुरु होते.

आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे बाधित मृत्त व्यक्तींची संख्या ६६ एवढी झाली आहे. यात ५८ मृत्यू हे नांदेड जिल्ह्यातील असून उर्वरीत सात मृत्यू हे इतर जिल्ह्यातील आहेत. आजच्या एकूण ४२० अहवालापैकी ३३७ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता एक हजार ३९४ एवढी झाली आहे. यातील ७४० एवढे बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आज रोजी ५८३ बाधितांवर औषधोपचार सुरु असून त्यातील १२ बाधितांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. यात चार महिला व आठ पुरुषांचा समावेश आहे. आज बरे झालेल्या ४७ बाधितांमध्ये पंजाब भवन कोवीड सेंटरमधून ३९, मुखेडमधून एक, जिल्हा रुग्णालय पाच आणि देगलूर कोवीड सेंटरमधून दोघांचा समावेश आहे.

हेही वाचा -  घोरपड विकणारी टोळी नांदेड वन विभागाच्या जाळ्यात

या परिसरातील आहेत बाधीत रुग्ण

नांदेड शहरातील बरतकपुरा एक, नविन मोंढा एक, चुना भट्टी एक, वसंतनगर एक, गणेशनगर एक, शिवाजीनगर एक, सिंधी काॅलनी एक, वजिराबाद एक, गोविंदनगर एक, दिलीपसिंग काॅलनी एक, गोवर्धन घाट एक, दीपनगर एक, अश्विनी हाॅस्पीटल एक, भगवती हाॅस्पीटल एक, फारुखनगर  एक, देगरलूर नाका एक, शारदानगर एक, सिडको पाच, दत्तनगर एक, सोमेश काॅलनी एक, वसरणी एक, नेरली ता. नांदेड चार, कासारखेडा ता. नांदेड एक, सोनखेड ता. लोहा एक, करीम काॅलनी अर्धापूर एक, चिंचगव्हाण बामणी ता. हदगाव दोन, गोकुळनगर देगलूर एक, देगलूर शहर तीन, लाईनगल्ली देगलूर दोन, शिवनेरीनगर देगलूर एक, भोईगल्ली देगलूर सहा, सुगाव ता. देगलूर एक, शहापूर ता. देगलूर एक, कुंटुर ता. नायगाव एक, नायगाव शहर दोन, बिलोली शहर एक, कासराळी ता. बिलोली एक, फुलेनगर मुखेड आठ, मुखेड शहर  एक, शिवाजीनगर मुखेड एक, आजादनगर उमरखेड जिल्हा यवतमाळ एक.

येथे आहेत बाधितांवर उपचार सुरु

जिल्ह्यात ५८३ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. त्यांना डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे १०३, पंजाब भवन कोविड केअर सेंटर येथे २१८, नायगाव कोविड केअर सेंटर येथे १०, जिल्हा रुग्णालय येथे २२, बिलोली कोविड केअर सेंटर येथे तीन, मुखेड कोविड केअर सेंटर येथे ८५, देगलूर कोविड केअर सेंटर येथे ४१, उमरी १०, हदगाव कोविड केअर सेंटर ११, गोकुंदा कोविड केअर सेंटर येथे एक, लोहा कोविड केअर सेंटर येथे ११, कंधार कोविड केअर सेंटर येथे आठ, भोकर दोन, धर्माबाद आठ, खाजगी रुग्णालयात ४४ बाधित व्यक्ती उपचार घेत असून औरंगाबाद येथे संदर्भित पाच, निझामाबाद एक आणि मुंबई एक आहेत.

येथे क्लिक कराकारगिल विजय दिनानिमित्त नांदेड येथे वृक्षारोपण

जिल्ह्यातील कोरोनाचे आकडे बोलतात

सर्वेक्षण- १ लाख ४८ हजार ५४५
घेतलेले स्वॅब- १२ हजार ६३८
निगेटिव्ह स्वॅब- १० हजार १५१
आज पॉझिटिव्ह स्वॅब संख्या- ६६
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- १३९४
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-१०
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-४
मृत्यू संख्या- ६६ (जिल्ह्यातील ५७ तर बाहेर जिल्ह्यातील सात)
रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- ७४०
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती- ५८३
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या- २४६.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded's concern persists: 66 more patients on Monday, two killed, number reaches 1394 nanded news