
रामेश्वर काकडे
नांदेड : स्वातंत्र्य दिन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच देशभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. नांदेड येथील मराठवाडा खादी ग्रामोद्योग समितीतर्फे राष्ट्रध्वज निर्मितीला वेग आला आहे. आजपर्यंत दहा हजारांहून अधिक विविध आकाराचे राष्ट्रध्वज येथे तयार करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे येथे तयार होणारा तिरंगा थेट दिल्लीतील लाल किल्ल्यावरही फडकतो हे नांदेडकरांसाठी अभिमानास्पद बाब आहे.