Nashik Road Accident : नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात आज (ता. ३० ) सकाळच्या सुमारास एका भरधाव डंपरने न्यू इंग्लिश स्कूल, चांदोरी येथे सातवीत शिकणारी विद्यार्थिनी (School Girl) सिद्धी मंगेश लुंगसे (वय १२) हिला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे तिचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघाताने संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.