esakal | 10 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोकअदालत पुढे ढकलण्यात आली- न्यायाधीश रोटे
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय लोकअदालत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यत पुढे ढकलण्यात आलेले आहे.

10 एप्रिल रोजीची राष्ट्रीय लोकअदालत पुढे ढकलण्यात आली- न्यायाधीश रोटे

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोविड-19 चा प्रार्दुभाव वाढत असल्यामुळे ता. 10 एप्रिल, 2021 रोजी नांदेड जिल्ह्यात व जिल्ह्यातील सर्व न्यायालयात आयोजित करण्यात आलेले राष्ट्रीय लोकअदालत महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशान्वये पुढील आदेशापर्यत पुढे ढकलण्यात आलेले आहे.

तरी विद्युत वितरण कंपनी, इंन्शोरंस कंपनी, विविध बॅंका, भारत संचार निगम लिमिटेड, फायनांन्स कंपनी, तसेच इतर सर्व शासकीय कार्यालयानी व इतर सर्व संबंधीतानी सदरील राष्ट्रीय लोकअदालत पुढे ढकलण्यात आले आहे. यांची नोंद घ्यावी असे आवाहन प्रमुख जिल्हा न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण एस. आर. जगताप  व सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आर. एस. रोटे यांनी केले आहे.

हेही वाचा दुधना आटताच परभणीचे गोकुळ आटले

नांदेड जिल्हा कोरोना मिटर

जिल्ह्यात 10 हजार 756 बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे 241, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड 106, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) 196, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड 140, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 144, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 331, देगलूर कोविड रुग्णालय 50, नायगाव कोविड केअर सेंटर 97, उमरी कोविड केअर सेंटर 29, माहूर कोविड केअर सेंटर 23, भोकर कोविड केअर सेंटर 16, हदगाव कोविड रुग्णालय 44, हदगाव कोविड केअर सेंटर 67, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 127, अर्धापूर कोविड केअर सेंटर18, बारड कोविड केअर सेंटर 12, मांडवी कोविड केअर सेंटर 8, महसूल कोविड केअर सेंटर 163, एनआरआय कोविड केअर सेंटर 272, पंजाब भवन कोविड केअर सेंटर 297, नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण 4 हजार 709, जैनब हॉस्पीटल कोविड केअर सेंटर देगूलर 89,बिलोली कोविड केअर सेंटर 226, हिमायतनगर कोविड केअर सेंटर 11,कंधार कोविड केअर सेंटर 99,धर्माबाद  कोविड केअर सेंटर 74, मुदखेड कोविड केअर सेंटर 11, नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 1 हजार 897 , खाजगी रुग्णालय 1 हजार 339 असे एकूण 10 हजार 756 रुग्ण उपचार घेत आहेत.

सोमवारी (ता. पाच) सांयकाळी 5 वाजेपर्यंत उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी येथे 9, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 7, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड येथे 6 खाटा उपलब्ध आहेत.

 • जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.
 • एकुण घेतलेले स्वॅब- 3 लाख 39 हजार 144
 • एकुण निगेटिव्ह स्वॅब- 2 लाख 83 हजार 672
 • एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 48 हजार 575
 • एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 36 हजार 657
 • एकुण मृत्यू संख्या-921
 • उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 74.46 टक्के
 • आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-14
 • आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-64
 • आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-376
 • रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-10 हजार 756
 • आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-204.
loading image