esakal | परीक्षांच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे स्वारातीम विद्यापीठासमोर निदर्शने 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

या अनुषंगाने विद्यापीठानुसार परीक्षा पध्दतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर निदर्शने करण्यात आली.

परीक्षांच्या गोंधळावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे स्वारातीम विद्यापीठासमोर निदर्शने 

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या धोक्याकडे सपशेल दुर्लक्ष करत महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. मात्र या परीक्षेत प्रचंड प्रमाणात गोंधळ उडाला असून विद्यार्थ्यांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने विद्यापीठानुसार परीक्षा पध्दतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणीच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठासमोर निदर्शने करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रात होणाऱ्या ऑनलाईन परीक्षांचा हट्ट सोडून विद्यार्थ्यांचा मानसिक छळ थांबवणे ही मुख्य मागणी होती. सर्वोच्य न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महाराष्ट्रामध्ये महाविद्यालयांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. मात्र या परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु असताना विद्यार्थ्यांना असंख्य प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचामंत्री वडेट्टीवार यांच्याकडे काॅंग्रेसने केल्या मागण्या, कोणत्या ते वाचा सविस्तर ? -

परीक्षा पद्धतीतील त्रुटी व विद्यार्थ्यांना आलेल्या अडचणी खालीलप्रमाणे.

 ँ नियोजनशुन्यता, मॉक टेस्टचा अभाव, कुशल मनुष्यबळाचा अभाव, अपात्रताधारक सर्विस प्रोव्हायडर, हेल्पलाईन केंद्राची अकार्यक्षमता व प्रशासकीय दिरंगाई, MCQ प्रश्नांची प्रश्नपेढी(QUESTION BANK) न पुरवणे यामुळे विद्यार्थी त्रस्त आहेत. 
ँ ँ ऑफलाइन पद्धतीच्या परीक्षा पण वेळेवर न होता चार- चार तास उशिरा होत आहेत, त्यामुळे विद्यार्थी मानसिक ताणातून जात आहे
ँ ँ ऑनलाईन परिक्षेत प्रश्न कसे असतील याची माहिती नसल्याने विद्यार्थ्यांना ताण येत आहे.
 ँ डिव्हाईसचा व कनेक्टिव्हीटीचा अभाव व त्यावर मात केली की ऑनलाईन पेपरचे लॉगइन होत नाही, लॉगइन झाले की पेपर येत नाही आणि पेपर आलाच तर तो सबमिट होत नाही असे एक ना अनेक समस्या विद्यार्थ्यांना येत आहे.
 ँ विद्यार्थ्यांना प्रश्न न दिसणे, साईट वर फक्त MCQ चे ऑपशन येत होते.
 ँ वेळोवेळी विद्यापीठाची साईट क्रॅश होत आहे.
 ँ वेबसाईटमध्ये अडचणी आल्यामुळे परीक्षा वेळेवर सुरू होत नाही. विद्यार्थ्यांना कित्येक तास ताटकळत रहावे लागते.
 ँ परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्यामुळे विद्यापीठाची हेल्पलाईन सतत व्यस्त लागत आहे.
 ँ परीक्षेच्या वेळेवर पेपर ओपन न होता दोन चार तासांनी पेपर सुरु होत आहे. काही विषयांचा पेपर अगदी रात्री उशिरा सुरु होत आहे तर काही वेळेस तो पुढे ढकलावा लागत आहे. 
 ँ एकाच दिवशी एकाच वेळी सर्व शाखांचे पेपर न घेता शाखानिहाय वेगवेगळ्या परिक्षा व्हायला हव्या होत्या. त्यामुळे सर्व्हरवर ताण आला नसता. या सर्व विद्यार्थी हा मानसिक त्रासातून जात आहे लवकरात लवकर ह्या अडचणी सोडून विद्यार्थ्यांचा होणारा खेळ थांबवावा या मागणीसाठी निदर्शने करण्यात आली, यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, फैसल सिद्दिकी, प्रसाद पवार, माधव बेंद्रिकर, अरून देसाई, विजय मोरे, संदीप कदम, महेश कल्याणकर, सोहेल लाला, दिलीप जमादार, इंगळेवाढ संजय, फजल रहमान, रोहित पवार इत्यादी पदाधिकारी विद्यार्थी उपस्थित होते.