Nanded : नांदेडमध्ये आजही एनसीबीचे छापे, गांजा केला होता जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Narcotics Control Bureau
Nanded : नांदेडमध्ये आजही एनसीबीचे छापे, गांजा केला होता जप्त

Nanded : नांदेडमध्ये आजही एनसीबीचे छापे, गांजा केला होता जप्त

नांदेड : नांदेडमधील दोन ठिकाणी अंमली पदार्थ नियंत्रक पथकाने (एनसीबी) (NCB) आज मंगळवारी (ता.१६) छापे टाकले असून सध्या चौकशी सुरु आहे. सोमवारी सकाळी (ता.१५) जिल्ह्यात एक हजार १२७ किलोग्रॅम गांजा जप्त करण्यात आला होता. यात अटक करण्यात आलेल्या दोघा (Nanded) आरोपींना आज स्थानिक न्यायालयासमोर सादर केले जाणार असल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा: पेट्रोल-डिझेलच्या किंमती अमेरिकेत ठरतात, रावसाहेब दानवेंचा दावा

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथून जळगावकडे गांजाची अवैध वाहतूक होणार असल्याची माहिती एनसीबीच्या पथकाला काही दिवसांपूर्वी मिळाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.

loading image
go to top