esakal | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजून भक्कम करणार- कोण म्हणाले ते वाचा?
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मराठवाडा विभागाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्यालय येथे पार पडली.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अजून भक्कम करणार- कोण म्हणाले ते वाचा?

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसची नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यांची आढावा बैठक राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, मराठवाडा विभागाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर कार्यालय येथे पार पडली. या आढावा बैठकीचे प्रस्तावना व नियोजन रा.वि.काँग्रेस चे नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम यांनी केले.

प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे या बैठकीला संबोधित करताना म्हणाले की, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस येणाऱ्या भविष्यातील काळात शहरातील प्रत्येक वार्डात, जिल्ह्यातील प्रत्येक गावात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस संघटन हे मजबूत करणार आहे तसेच तळागळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचून त्यांच्या अडीअडचणी समजून घेणार व सोडवणार आहे.नांदेडला विद्यापीठ असल्यामुळे नांदेड जिल्ह्यावर विशेष लक्ष दिले जाईल. तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मध्ये सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल व जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पक्षाचे विचार कसे पोहोचतील याकडे लक्ष दिले जाईल.

हेही वाचा नांदेड दक्षिणमधील प्लॉटधारक का आहेत आत्मदहनाच्या तयारीत, वाचा सविस्तर

खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने कोविड शुल्कनीती अभियान राज्यभरात सुरू केले आहे  व त्यास खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद भेटत आहे. असे विविध अभियान उपक्रम राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने येणाऱ्या काळात राज्यभरात केले जातील असे त्यांनी आढावा बैठकीस संबोधित केले.

यांची होती उपस्थिती

यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस नांदेड शहर जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, परभणी जिल्हाध्यक्ष सुमंत वाघ, परभणी शहर जिल्हाध्यक्ष दीपक वारकरी, हिंगोली जिल्हाध्यक्ष सुजय देशमुख, नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्रीकांत मांजरमकर, नांदेड सोशल मीडिया चे अध्यक्ष मो.दानिश व तसेच नांदेड, परभणी, हिंगोली या जिल्ह्यातील शहर व ज़िल्हा कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी, तालुका अध्यक्ष, नगरपालिकेचे शहराध्यक्ष व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. हे बैठक यशस्वी करण्यासाठी फैसल सिद्दिकी,प्रसाद पवार,अरून देसाई, रोहित पवार, अजय मुंगल,प्रसाद बुटले, विजय मोरे, अमोल राजेगोरे,महेश कल्याणकर, संदीप कदम यांनी परिश्रम घेतले.