Nanded News : आरक्षणासाठी केंद्राची भूमिका महत्त्वाची - अशोक चव्हाण

अशोक चव्हाण : पुढाकार घेऊन कायदा करण्याची गरज
ashok chavan
ashok chavansakal

अर्धापूर (जि.नांदेड) : मराठा समाजासह अन्य समाज घटकांच्या आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने घातलेली पन्नास टक्क्यांची अट रद्द करण्याची आवश्यकता आहे. ही अट रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन कायदा करण्याची गरज असल्याचे मत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याचा अग्निप्रदीपन कार्यक्रम शुक्रवारी झाला. त्यावेळी चव्हाण बोलत होते. माजी आमदार अमर राजूरकर, कारखान्याचे अध्यक्ष गणपत तिडके यांच्यासह शेतकरी, संचालक उपस्थित होते. चव्हाण म्हणाले, ‘‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे नुकत्याच झालेल्या सभेला लाखो समाजबांधव उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी शासनाला ४० दिवसांचा अवधी दिला आहे.

तो २४ ऑक्टोबरला संपत आहे. याबाबत निर्णय घेण्यासाठी राज्य शासनाकडे अधिकार नाहीत. याबाबत विधानसभेत भूमिका मांडली आहे. गेल्या वर्षभरात यावर काम केले आहे. मराठा समाजासह इतर समाज घटकांना आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची गरज आहे.’’

‘प्रशासकीय बाबींवर लक्ष द्यावे’

राज्यात कंत्राटी भरतीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर चव्हाण म्हणाले, की महाविकास आघाडी सरकारच्या काळात कार्यकारी पदांवर कंत्राटी भरती झाली नव्हती.

आता मात्र तहसीलदार, नायब तहसीलदार, पोलिस अशा पदांवरही कंत्राटी भरतीचा प्रयत्न होत आहे. पूर्वीच्या सरकारवर खापर फोडून राज्य सरकार आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करते आहे. आज राज्य आर्थिक अडचणीत असताना काही तरी जुने संदर्भ काढून टीका करण्यापेक्षा सरकारने प्रशासकीय बाबींवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

सुनील कावळेंना अखेरचा निरोप

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आत्महत्या केलेले मुकुंदवाडी येथील सुनील कावळे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी एपीआय कॉर्नर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘अमर रहे, अमर रहे, सुनील कावळे अमर रहे’च्या घोषणा यावेळी तरुणांनी दिल्या. कावळे यांच्या पार्थिवाला त्यांच्या मुलाने अग्नी दिला.

यावेळी भाजप आमदार हरिभाऊ बागडे, नारायण कुचे यांना समाजबांधवांच्या रोषामुळे माघारी परतावे लागले. पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर असल्याने मुकुंदवाडी परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. या वेळी सकल मराठा समाजाच्या वतीने सुकन्या भोसले, डॉ. दिव्या पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com