esakal | सांगवीच्या आसना नदीवरील नविन पुलाने वाहतूकीची कोंडी फुटणार, पालकमंत्री अशोक चव्हाण करणार शुक्रवारी भूमीपुजन
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) :  तुळजापूर- नागपूर या 361 राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगावजवळ असलेल्या आसना नदीवर नव्याने पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 22)  होणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे या राष्ट्रीय महामार्गावर सतत होणा-या वाहतूकीच्या कोंडीची समस्या सुटणार आहे. गेल्या महिन्यातच या बांधकामाचे भूमीपुजन होणार होते. पण ग्रामपंचायत निवडणूकीमुळे हा भूमीपुजनाचा सोहळा स्थगित करावा लागला होता.

सांगवीच्या आसना नदीवरील नविन पुलाने वाहतूकीची कोंडी फुटणार, पालकमंत्री अशोक चव्हाण करणार शुक्रवारी भूमीपुजन

sakal_logo
By
लक्ष्मीकांत मुळे

अर्धापूर  ( जिल्हा नांदेड ) :  तुळजापूर- नागपूर या 361 राष्ट्रीय महामार्गावरील पिंपळगावजवळ असलेल्या आसना नदीवर नव्याने पुल बांधण्यात येणार आहे. या पुलाच्या बांधकामाचे भूमीपुजन पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. 22)  होणार आहे. या पुलाच्या बांधकामामुळे या राष्ट्रीय महामार्गावर सतत होणा-या वाहतूकीच्या कोंडीची समस्या सुटणार आहे. गेल्या महिन्यातच या बांधकामाचे भूमीपुजन होणार होते. पण ग्रामपंचायत निवडणूकीमुळे हा भूमीपुजनाचा सोहळा स्थगित करावा लागला होता.

तुळजापूर- नागपूर हा राष्ट्रीय माहामार्गावर शहराच्या सांगवी भागात आसना नदीवर सध्या दोन पुलं आहेत. यातील एक पुल बारा वर्षापुर्वी बांधण्यात आला आहे. तर दूसारा पुल हा ब्रिटिश कालीन असून त्याची कालमर्यादा संपली आहे. तसेच या पुलाची पडझड झाली असल्यामुळे या पुलावरील जड वाहणाची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

या राष्ट्रीय महामार्गावर सतत वाहनांची वर्दळ असते. या मार्गावरुन दक्षिणेकडील व उत्तरेकडील राज्यात जड वाहनांची वाहतुक खूप मोठी आहे. तसेच नांदेड शहरात येणा-या प्रमुख मार्गापैकी हा उत्तरेकडील प्रमुख मार्ग असल्यामुळे या महामार्गवर वाहतूकीचा ताण असतो. नव्याने बांधण्यात आलेल्या पुल अरुंद असल्यामुळे वाहतूकीची कोंडी होणे ही नित्याचीच बाब झाली आहे. याचा फटका शालेय विद्यार्थी, शासकीय, निमशाकीय कर्मचारी, रुग्णवाहिका यांना बसत आहे. या नदीवर नव्याने पुल बांधण्यात यावी अशी मागणी सातत्याने होत होती. या पुलावर होणारी वाहतूकीची कोंडी लक्षात घेवून बांधकाम तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी विशेष प्रयत्न करुन पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर केला आहे. या निधीतून पुलाचे बांधकाम होईल.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image