
नांदेड : फिरोजपूर-हजूर साहिब नांदेड एक्स्प्रेस ही नवीन साप्ताहिक एक्स्प्रेस रेल्वे शुक्रवार (ता. १३) पासून सुरू करण्यात येत आहे. दर शुक्रवारी फिरोजपूरहून प्रस्थान करील. हीच रेल्वे दर रविवारी परतीचा प्रवास करील. १५ जून रोजी हजूर साहिब येथून दुपारी ११:५० वाजता प्रस्थान करुन फिरोजपूर(पंजाब) कडे पहिला प्रवास प्रारंभ करणार आहे.