esakal | मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 19 कोटींचे वसतिगृह; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश
sakal

बोलून बातमी शोधा

A new hostel building worth Rs 19 crore has been approved for medical college students at Nanded.jpg

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात विविध विकासकामे मार्गी लावली आहे.

मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी 19 कोटींचे वसतिगृह; पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांना यश

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : नांदेड येथे ईबीसी मुलांचे वसतिगृह, बीएड कॉलेजची भव्य इमारतीच्या मंजुरीनंतर आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांसाठी 18.86 कोटी रुपयाच्या नवीन वसतिगृहाच्या इमारतीस मान्यता मिळवून घेतली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे केवळ एका महिन्यात नांदेड शहरात तीन भव्य शासकीय वास्तू आकारास येणार आहेत.

नांदेडमधील बातम्यांसाठी येथे क्लिक करा 

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड जिल्ह्यात विविध विकासकामे मार्गी लावली आहे. अलिकडेच आसना नदीवरील पुलाचे पुनर्निर्माण, समृद्धी महामार्ग नांदेडला जोडणे, उमरी, धर्माबाद शहरात रेल्वे उड्डाणपुलाची निर्मिती करणे, नांदेड ते धर्माबाद-तेलंगणा सिमेपर्यंत 1461 कोटींचा रस्ता तयार करणे यासह अनेक विकासकामांना त्यांनी याच काळात गती दिली आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी नांदेड येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची वसतिगृहाची अडचण लक्षात घेऊन त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागास पत्र दिले होते. त्यांच्या पत्राची दखल घेऊन संबंधित विभागाने सार्वजनिक बांधकाम विभागास वसतिगृहाच्या बांधकामासाठी उच्चाधिकार समितीने घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने 18.86 कोटी रुपये इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शाखेचे शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी तसेच आंतररुग्ण व अपघात विभागातील सेवेसाठी महाविद्यालय परिसरात राहणे आवश्यक आहे. परंतु वसतिगृह नसल्याने वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. ही अडचण पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी ओळखून वसतिगृहाचा प्रस्ताव मागणीला व त्यास शासनास मंजुरी मिळवून देण्यात यशस्वीरित्या प्रयत्न केले.

loading image