esakal | नांदेडच्या हवामान अंदाज केंद्राचा कारभारच रामभरोसे सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

नांदेड - वजिराबादमधील मल्टीपर्पज हायस्कूलच्या मैदानावर उभारलेले हवामान अंदाज केंद्र.

नांदेडच्या हवामान अंदाज केंद्राचा कारभारच रामभरोसे सुरु

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : जिल्ह्यातील (Nanded) शेतकरी, उद्योग, व्यावसायिकांसह शहरी भागातील जनतेला त्यांच्या दररोजच्या कामकाजात हवामानावर आधारीत अंदाज उपयोगी पडत असतो. शिवाय जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागास देखील रोजच्या हवामानाचा अंदाज महत्वाचा असतो. परंतु हवामान अंदाज केंद्राचा कारभारच रामभरोसे सुरु असल्याचे दिसून येते. नांदेड शहरात वजिराबाद भागात मल्टीपर्पज शाळेच्या मैदानावर हवामान अंदाज केंद्र (Weather Forecast Center) आहे. या ठिकाणी लाखो रुपये खर्चून केंद्र उभारण्यात आले आहे. या ठिकाणी काही वर्षे हवामान अंदाज निरिक्षक म्हणून बालासाहेब कच्छवे कार्यरत होते. त्यांची बदली झाल्यानंतर त्यांच्याकडील पदभार उमाकांत पंचगले यांच्याकडे सोपविण्यात आला.

हेही वाचा: तुळजापुरात आयसीआयसीआय बँकेची फसवणूक, ६३ तोळे बनावट सोने तारण

दरम्यान, गेल्या आठवड्यात नांदेड शहरासह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे सर्वांनाच माहितीची गरज होती. मात्र, या ठिकाणी माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता श्री. पंचगले हे बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यात दोन दिवसासाठी ‘येलो’ आलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुढील दोन दिवसात हवामानाचा अंदाज नेमका कसा असेल, कुठल्या भागात पावसाचा व वाऱ्याचा वेग काय असेल व त्यासाठी नागरीकांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी? ही माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत दिली गेली. त्यामुळे स्थानिक पातळीवर मल्टीपर्पज हायस्कुलच्या मैदानावर असलेले हवामान अंदाज केंद्राची महत्वाची भूमिका होती.
नव्याने हवामान निरीक्षकाचा पदभार स्विकारलेले उमाकांत पंचगले हे बाहेरगावी असल्याने त्यांच्या शाळेतील एका शिक्षकाने सोमवारच्या जिल्ह्यातील पावसाची नोंद सांगितली खरी परंतु ही नोंद मिलीमीटरमध्ये होते की सेंटीमीटरमध्ये केली जाते.

हेही वाचा: नांदेडमध्ये पाच जण कोरोनाबाधित, ३३ रुग्णांवर उपचार सुरु

या बद्दल त्यांच्या मनात शंका होती. त्यामुळे त्या शिक्षकांने जिल्ह्यातील पावसाची नोंद ३७.२ अशी असल्याचे सांगितले. त्यामुळे सोमवारची जिल्ह्यातील हवामानाची नोंद मुंबई स्थित कुलाबा हवामान वेधशाळेला ही माहिती पोहली की नाही? याबद्दल शंकाच आहे. नव्याने पदभार स्विकारलेल्या शिक्षकास अनुभवी व्यक्तीकडून प्रशिक्षण घेणे गरजेचे असून त्यासाठी किती दिवस लागणार व त्यानंतर स्थानिकच्या हवामान केंद्राकडून योग्य वेळी योग्य वेळेत अचुक माहिती दिली जाणार का? हा प्रश्‍न महत्वाचा आहे. मागील काही दिवसापासून शहरातील या हवामान अंदाज केंद्रावर काम करण्यावरुन दोन गट तयार झाल्याने व त्यांच्या वर्चस्व वादामुळे हवामान अंदाज केंद्राचे पुढे काय होणार? हा प्रश्‍नच आहे. मात्र, असे असले तरी, नुकतेच हवामान निरिक्षक म्हणून पदभार घेतलेल्या शिक्षकाकडून अचूक व योग्य हवामानाचा अंदाज मिळत राहील? अशी अपेक्षा व्यक्त करणे योग्य राहील, अशी अनेकांची भूमिका आहे.

loading image
go to top