esakal | तुळजापुरात आयसीआयसीआय बँकेची फसवणूक, ६३ तोळे बनावट सोने तारण
sakal

बोलून बातमी शोधा

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) - आयसीआयसीआय बॅकेची फसवणूक केल्या प्रकरणी चौघा जणांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.

तुळजापुरात आयसीआयसीआय बँकेची फसवणूक, ६३ तोळे बनावट सोने तारण

sakal_logo
By
जगदीश कुलकर्णी

तुळजापूर (जि.उस्मानाबाद) : येथील आयसीआयसीआय बँकेत (ICICI Bank) 63 तोळे बनावट सोने तारण ठेवून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी मंगळवारी (ता.14) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी सांगितले की, सद्दाम शेख यास मोहोळ (जिल्हा सोलापूर) येथून अटक करण्यात आली आहे. तसेच रसिद अल्लाउद्दीन नदाफ राहणार अरबळी (ता.तुळजापूर) आणि (Osmanabad) कोंडाजी हारूण खुदादे (रा.इटकळ ता.तुळजापूर) (Tuljapur) तसेच अब्बास राजू पठाण (रा. इटकळ ता.तुळजापूर) यास मंगळवारी अटक करण्यात आली आहे. 1 लाख 35 हजार 100 रूपये जप्त करण्यात आले असून बँँकेत 3 लाख 21 हजार 556 रूपये संशयित आरोपींनी बँकेत भरणा केला आहे.

हेही वाचा: सुखद! मराठवाड्यातील मोठी चार धरणे भरली शंभर टक्के

या संदर्भात बॅंकेचे व्यवस्थापक सुनील क्षीरसागर यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक राजतिलक रोशन, अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पालवे, उपविभागीय पोलिस अधिकारी अंजूम शेख, पोलिस निरीक्षक आदिनाथ काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार ज्ञानेश्वर कांबळे तपास करीत आहेत.

loading image
go to top