"सब तरफ खुशीया ही खुशीया बाटूंगा...खाली साथ दो, बाकी मै संभाल लुंगा" | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ashok chavan
"सब तरफ खुशीया ही खुशीया बाटूंगा...खाली साथ दो, बाकी मै संभाल लुंगा"

"सब तरफ खुशीया ही खुशीया बाटूंगा...खाली साथ दो, बाकी मै संभाल लुंगा"

भोकर: केंद्रात भाजपाचे सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. अनेक विकास कामांना गतीरोधक लावून शेतक-यांना वेठीस धरण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाला देगलूर व इतर ठिकाणी चपराक बसताच शेतकरी कृषी कायदा रद्द करावा लागला. मराठवाड्यातील रेल्वे प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले गेले आहे त्यामुळे त्यांच्यावर आता भरवसा राहिला नाही. राहिला प्रश्न या भागातील विकासाचा " मैं हू ना...तो डर किस बात का है..सब तरफ खुशीया ही खुशीया बाटूंगा...खाली साथ दो, बाकी मै संभाल लुंगा..!’’ अशा शब्दात पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी जनतेला सोमवारी (ता. २२) दिलासा दिला.

हेही वाचा: सत्ताधीशांनी दररोज आत्मपरीक्षण करावे: सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा

सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते सुमारे ३८ कोटी रूपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आणि शहरातील रेल्वे उड्डाणपूलाचा लोकार्पण सोहळा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर आमदार अमर राजूरकर, माजी आमदार अमिता चव्हाण, ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हा परिषदेच्या मंगाराणी अंबुलगेकर, नामदेव आयलवाड, नागनाथ घिसेवाड, निता रावलोड, नागोराव कोठुळे, जगदीश पाटील भोसीकर, विनोद पाटील चिंचाळकर, भगवान दंडवे, प्रकाश देशमुख भोसीकर, विठ्ठल धोंडगे, मिर्झा ताहेर बेग, सविता मुसळे, बाबूराव आंदबोरीकर, शेख यूसुफ, माधव अमृतवाड, आनंद चिठ्ठे बोरगांवकर, विक्रम क्षीरसागर, मारोती बल्लाळकर, अॅड. शिवाजी कदम, गणेश राठोड, खाजू इनामदार, गौतम कसबे, मधुकर गोवंदे, बाळासाहेब पाटील रावणगावकर, कंत्राटदार माधव एकलारे, ज्ञानेश्वर एकलारे यांची उपस्थिती होती.

चव्हाण म्हणाले की, शहरातील वैभवात भर घालणा-या उड्डाणपुलाचे काम रेल्वे विभागाच्या दुर्लक्षामुळे रखडले होते. मी स्वत लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्ण करुन घेतल्याने आज रहदारीसाठी पुल खुला करण्यात आला आहे. आता वाहतुकीची कोंडी होणार नाही. उड्डाणपुलाखाली पोलीस चौकी, शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्याने लवकरच कामे पूर्ण होतील. सुंदर आणि स्वच्छ शहर करून वृक्ष लागवड केली जाईल. येथील पालिका भविष्यात बक्षीसास पात्र ठरेल, अशी कामे करण्याचा मानस आहे. शहरातील किरकोळ व्यापा-यांना कसलाच त्रास होणार नाही, याची दक्षता घेऊन स्वतंत्र गाळे उभारून व्यापाराला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

औद्योगिक वसाहतीत ३० एकर क्षेत्रात अद्ययावत व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. देगलूरमधील आणि इतर ठिकाणच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागल्याने कृषी कायदा रद्द करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी प्रास्ताविक केले. मनोज गिमेकर यांनी सुत्रसंचालन केले तर रामचंद्र मुसळे यांनी आभार मानले.

हेही वाचा: प्रवाशांना त्रास होऊ नये यासाठी ST संपकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढा - HC

औद्योगिक वसाहतीत ३० एकर क्षेत्रात अद्ययावत व्यापारी संकुल उभारले जाणार आहे. देगलूरमधील आणि इतर ठिकाणच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपाच्या जिव्हारी लागल्याने कृषी कायदा रद्द करावा लागला असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे यांनी प्रास्ताविक केले. मनोज गिमेकर यांनी सुत्रसंचालन केले तर रामचंद्र मुसळे यांनी आभार मानले.

loading image
go to top