उर्दू नव्हे तर जागतिक शायरी विश्वातील सूर्याचा अस्त- डॉ. फहीम सिद्दीकी

प्रल्हाद कांबळे
Wednesday, 12 August 2020

बुलाती है मगर जाणे का नही.. एम बोलेतो मुन्नाभाई चे रचीयता राहत इंदोरी अनंतात विलीन.

नांदेड : प्रसिद्ध व लोकप्रिय उर्दू, हिंदीचे महान शायर राहत इंदोरी यांचे निधन झाले. ते उर्दूचेच नव्हे तर जागतिक पातळीवरचे शायर होते. सर्व जगभर आपल्या विशेष शैलीमुळे ते लोक प्रिय झाले  होते.  अनेक चित्रपटासाठी त्यांनी गाणी लिहिली होती. मुन्नाभाई एमबीबीएसचे शीर्षक गीत अत्यंत लोकप्रिय झाले होते. गीत कार अनु मलिक यांच्या सोबत अनेक गीत त्यांनी लिहले होते. अखिल भारतीय पातळीच्या मुंबई, औरंगाबाद, यवतमाळ, नागपूर, आणि नांदेड येथे राहत इंदोरी सोबत मी खूप मुशायरे कार्यक्रमात सहभागी झालो होतो.

आपल्या शेर सादरीकरणाच्या खास शैलीमुळे ते सर्व दूर प्रसिद्ध व लोकप्रिय होते. संपूर्ण सभागृह स्तब्ध होऊन शेर ऐकत व भरपूर दाद देत असत. जनसामन्यांची नाडी धरून ते शायरी करत. बेबाकीने ते शेर म्हणतं होते. असा कोणताही देश नाही जेथे राहत इंदोरीचे प्रेमी नाहीत. जागतिक पातळीचा एक दिग्गज शायर म्हणून त्यांची ओळख होती. युवा पिढी तर त्यांची पागल होती. " बुलाती है मगर जाने का नई.. ये जिंदगी है उदहर जाने का नई" तसेच जुबां है तो बोल नजर मिला जवाब तो दे.. मै कितनी बार लुटा हूं इस्का हिसाब तो दे.. इष्क मे जीत के आणे के लिये काफी हूं.. मै जमाने के लिये अकेला ही काफी हूं.. मेरे हुजरे मे नहीं और कही रख दो. अस्मा लाये हो लाओ जमी पर रखदो...आणि जग भर पसंत केले गेले ला त्यांचा शेर.. आज जो मसनद (गद्दी ) पे जो बैठे हैं कल नही होंगे. किराये दार हैं मालिके मकान थोडी हैं. असे बेबाकीचे शेर म्हणणाऱ्या शायरचे निधन झाल्याचे  ऐकून मन सुन्न झाले.. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो अशी प्रतिक्रिया फकरे मराठवाडा पुरस्कार प्राप्त शायर प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे उर्दू विभाग प्रमुख निवृत्त प्राध्यापक डॉ. फहीम सिद्दीकी यांनी दिली आहे.

हेही वाचा -  धक्कादायक : पतीचा अपघातात मृत्यू, मात्र घडले भलतेच, काय आहे प्रकरण वाचा...

राहत इंदोरी यांच्या निधनामुळे उर्दू शायेरीचा एक स्वर्ण पर्व संपला- डॉ. शुजा कामिल

नांदेड : राहत इंदोरीच्या निधनामुळे जागतिक पातळीच्या साहित्याचा एक स्वर्ण पर्व संपला असे राहत इंदोरी सोबत मुशायेरे आयोजित करणारे नांदेडचे प्रसिद्ध शायर प्राचार्य डॉ. शुजा कामिल यांनी सांगितले.

राहतभाई सोबत मी अनेक अखिल भारतीय उर्दू मुशायेऱ्यात सहभागी झालो. 1982 पासून त्यांचे माझे स्नेहाचे संबंध  होते. विशेषतः परभणी उरूस निमित्त आयोजित अखिल भारतीय उर्दू मुशायरा आयोजनात आम्ही सोबत होतो. राहत इंदोरी हे आपल्यामध्ये एक विद्यापीठ होते. असे म्हटल्यास अयोग्य होणार नाही. जागतिक पातळीवर होणाऱ्या घटना व विशेषता राजकीय संदर्भावर बेबाकीने शायरी करणारा शायर म्हणजे राहत इंदोरी. जागतिक स्तरावर लोक प्रियता मिळवणारा एक प्रमुख शायेर होते राहत इंदोरी. श्रोत्यांची पहिली पसंत म्हणजे राहत होते. पहाटे चार वाजेपर्यंत केवळ राहत इंदोरी साठी श्रोते प्रतीक्षा करत असत. त्यांचे माझे आवडते शेर "तुफानो से आंख मिलाओ सै लाबो पर वर करो. मल्लाओ का चक्कर छोडो तैर के दरिया पार करो". आणि त्यांचा हा शेर आज प्रत्येक्षात उतरला आहे. "ये हादसा तो किसी रोज गुजरने वाला था.. मै बच भी जाता तो एक दिन मरने वाला  था.". शायरी व कविताची आवड असणाऱ्या लोकांच्या मनात वास करणारा लोकप्रिय शायर अनंतात विलीन झाला आहे याचे मला फार दुःख झाले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Not Urdu, but the setting of the sun in the world of world poetry. Faheem Siddiqui nanded news