सोशल मिडीयाच्या ‘#ओला_दुष्काळ’ ट्रेंडची दखल

प्रल्हाद कांबळे
Sunday, 18 October 2020

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाइ जगताप, प्रविण गायकवाड यांचाही संदेश

नांदेड : राज्यात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पुर परिस्थितीमुळे लाखो हेक्टरवरील हंगामी पिकांसह बागायती व फळबागांचे नुकसान झाले. हाताशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांचे करोडोंचे नुकसान झाले. याबाबत शासनाने लक्ष वेधावे यासाठी नांदेड, सोलापूर, अहमदनगर, सातारा या जिल्ह्यातील सामाजीक माध्यमात (सोशल मिडीया) ॲक्टीव असलेल्या शेतकरी पुत्रांनी ‘#ओला_दुष्काळ’ असा ग्रुप तयार केला. यानंतर ‘ट्वीटर, फेसबुक व व्हाट्सअप’च्या माध्यमातून ट्रेंड तयार झाला. यात राज्यातील हजारो नागरिकांसह विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे भाइ जगताप, सामाजीक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांनी ट्रेंडला टॅग करुन संदेश पाठविला.

राज्यात सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. हाताशी आलेले मुग, उडीद त्यावेळच्या पावसाने गेले. यानंतर ऑक्टोबरमध्ये झालेल्या परतीच्या पावसाने कहरच केला. यात सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर या हंगामी पिकासह बागायती व फळपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या काळात शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी राज्यातून होवू लागली. परंतु शासनाकडून ठोस निर्णय होत नव्हता. याकडे शासनाचे लक्ष वेधावे यासाठी नांदेड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी संतोष गव्हाणे, सोलापूरचे ब्रम्हा चटे यांनी 
प्रथम ‘#ओला_दुष्काळ’ असा टॅग ग्रुप तयार केला.

हेही वाचा -  राज्याच्या इतिहासात आजवर घडले नाही असे राज्यपालांचे वर्तन- विजय वडेट्टीवार -

देवेंद्र फडणवीस यांनीही केले टॅग

यानंतर साताराचे प्रदीप कणसे, नगरचे संग्राम देशमुख, बारामतीचे अनिल माने अशा शेतकरी पुत्र एकत्र येवून यात भाग घेतला. यानंतर ‘ट्वीटर, फेसबुक व व्हाट्सअप’च्या माध्यमातून ट्रेंड तयार झाला. यात राज्यातील हजारो नागरिकांनी सहभाग नोंदविला. हा ट्रेंड लक्षवेधी ठरल्याने माजी मुख्यमंत्री तथा विधान सभेतील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे प्रवक्ते भाइ जगताप, सामाजीक कार्यकर्ते प्रविण गायकवाड आदींनी ट्रेंडला टॅग करुन संदेश पाठविला.

 ‘#ओला_दुष्काळ’ असा टॅग ग्रुप तयार 

अतिवृष्टीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, याकरिता सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता म्हणुन सोशल मिडीयाच्या माध्यमातून ‘#ओला_दुष्काळ’ असा टॅग ग्रुप तयार केला. याला राज्यातील तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
- संतोष गव्हाणे, प्रदेश पदाधिकारी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नांदेड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Notice the ‘#wet_drought’ trend on social media nanded news