सहकारी पतपेढीला जिल्हा उपनिबंधकांची नोटीस, कुठे ते वाचा...  

file photo
file photo
Updated on

नांदेड : जिल्हा परिषदेच्या सहकारी पतपेढी शिक्षण विभागाची सभा नियोजीत आहे. सत्ताधारी संचालकांना वार्षिक नफातोटा पत्रक, अंदाज पत्रकाशिवाय सभा घेण्यास उपनिबंधक प्रविण फडणीस यांनी नोटीसीद्वारे चपराक दिली आहे. नियोजीत सभेसाठी संचालकांना ताळेबंद देण्याच्या नोटीसीद्वारे आदेशीत करण्यात आल्याने संचालक मंडळीत खळबळ उडाली आहे. आपल्या आदेशान्वये संचालकांना ताळेबंद देण्यास भाग पाडले आहे.

सहकारी पतपेढी शिक्षण विभाग मर्यादित जिल्हा परिषदची मासिक सभा ता.१३ जून रोजी पतसंस्थेच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बाबतचे सर्व संचालकांना पत्र सचिवांनी ता. सहा जून रोजी पाठवले होते. या सभेत गेल्या आर्थिक वर्षातील पतसंस्थेच्या कारभाराच्या आर्थिक ताळेबंद मान्यता घेण्याचा विषय ठेवण्यात आला. परंतु संस्थेच्या संचालकांना सचिवांनी पाठवलेल्या नियोजित मासिक बैठकीचे पत्रासोबत केवळ एप्रिल व मे या दोन महिन्याच्याच मासिक जमा खर्चाचे विवरण दिले होते.

बैठकीतील विषय क्रमांक सहा अन्वये नमूद २०१९ - २०२० या वर्षाच्या जमाखर्च पत्रक; नफा - तोटा पत्रक व ताळेबंद पत्रक मंजुरीचा विषय नमूद करून २०२० - २०२१ या वर्षासाठीच्या अंदाजपत्रकास संदर्भात बैठकीत मंजुरी देण्यासंबंधी विषय उल्लेख करण्यात आला. परंतु संचालकांना बैठकीची सूचना देत असताना ताळेबंद पत्रक तसेच नियोजित अंदाज पत्रक यांचे विवरण देणे टाळले. त्यानुसार पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत मेकाले यांच्यासह इतर तीन संचालकांनी जिल्हा उपनिबंधक प्रवीण फडणीस यांचेकडे धाव घेऊन प्रकरणाचा पाढा वाचला.

यावर शुक्रवारी ता. १२ जून जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था प्रवीण फडणीस यांनी पतसंस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना स्वयंस्पष्ट निर्देश देत संचालक मंडळाच्या बैठकीत पूर्वी संस्थेच्या सर्व संचालकांना मागील वर्षाचे नफा - तोटा पत्रक, ताळेबंद, अंदाजपत्रक तत्काळ देण्याचे नोटीसद्वारे आदेशीत केले. त्यानंतर पतसंस्थेच्या सर्व संचालकांना ताळेबंद पत्राच्या प्रती वाटप करण्याचे काम संस्थेच्या वतीने दिवसभर चालू असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. 

जिल्हा उपनिबंधकांची नोटीस सहकारी पतसंस्थेच्या सत्ताधारी मंडळांना दिलेली सणसणीत चपराक असून पतसंस्थेचे संचालक चंद्रकांत मेकाले, प्रल्हाद राठोड, विजय पल्लेवाड, सुमनताई डांगे यांनी निवेदन दिले होते. निबंधकांच्या आदेशाने खडबडून जागी झालेल्या सत्ताधारी मंडळीकडून दिवसभर ताळेबंद वाटप करण्यात येत होते. पतसंस्थेच्या कारभाराचीच चर्चा दिवसभर विविध समाज माध्यमांवर सभासदांतून रंगली होती.

पतसंस्थेचा वार्षिक ताळेबंद हा सत्ताधारी मंडळींचे यशापयश दर्शवणारा असतो त्यामुळेच सत्ताधारी मंडळी विरोधी संचालकांना ऐनवेळी सभागृहातच ताळेबंद देण्याच्या मानसिकतेत होते. तो प्रयत्न आम्ही जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशान्वये हाणून पाडला.
- चंद्रकांत मेकाले, संचालक. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com