
नांदेड : शहरातील विष्णुपुरी परिसरात अनेक वर्षांपासून दहशत निर्माण करणारा सराईत गुन्हेगार प्रभाकर हंबर्डेची शुक्रवारी (ता. २०) नांदेड ग्रामीण पोलिसांनी रस्त्यावरून धिंड काढली. हंबर्डे याच्यावर जबरी चोरी, खंडणी, मारहाण, दरोडा, हप्ता वसुली आदी दहापेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपूर्वी त्याच्यावर ‘मोक्का’अंतर्गत कारवाई झाली होती.