नांदेडला कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या अडीचहजारावर

अभय कुळकजाईकर
Tuesday, 18 August 2020

मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण ८०२ अहवालापैकी ६२७ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आता चार हजार ३२५ झाली आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४६ आणि ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीत ९२ असे १३८ रुग्ण मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, १८२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली.

नांदेड - नांदेडला दिवसभरात मंगळवारी (ता. १८) प्राप्त झालेल्या अहवालात १३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर १८२ जणांची प्रकृती गंभीर असून दिवसभरात चार रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. दरम्यान, मंगळवारी ८४ कोरोना बाधित रुग्णांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुटी देण्यात आली असून आत्तापर्यंत दोन हजार ५६१ रुग्ण बरे झाले आहेत. 

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी ही माहिती दिली. मंगळवारी दिवसभरात चार रुग्णांचा मृत्यू झाला असून त्यामध्ये हणेगाव (ता. देगलूर) येथील ५५ वर्षीय पुरूष, नवघरवाडी (ता. कंधार) येथील ६८ वर्षीय पुरुष, सुगाव खुर्द (ता. नांदेड) येथील ६५ वर्षीय पुरुष आणि कहाळा (ता. नायगाव) येथील पुरूषाचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेडला शनिवारी दुकाने सुरु ठेवण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय -

१८२ जणांची प्रकृती गंभीर
मंगळवारी प्राप्त झालेल्या एकूण ८०२ अहवालापैकी ६२७ निगेटिव्ह अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी १३८ अहवाल पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या आता चार हजार ३२५ झाली आहे. आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४६ आणि ॲन्टीजेन टेस्ट किटद्वारे तपासणीत ९२ असे १३८ रुग्ण मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, १८२ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉ. भोसीकर यांनी दिली. मंगळवारी दिवसभरात ८४ कोरोनाबाधित रुग्णांना औषधोपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णालयातून सुटी दिलेल्या रुग्णांची संख्या आता दोन हजार ५६१ इतकी झाली आहे.  

मंगळवारी दिवसभरात आढळलेले तालुकानिहाय रुग्ण
नांदेड महापालिका - ३७, नांदेड ग्रामिण - एक, भोकर - चार, कंधार - सात, नायगाव - आठ, किनवट - दोन, अर्धापूर - एक, देगलूर - दोन, मुखेड - दहा, माहूर - एक, धर्माबाद - सात, उमरी - दहा, हदगाव  सहा, बिलोली - दोन, परभणी - दोन, हिंगोली - पाच, यवतमाळ - एक, लातूर - एक,  आदिलाबाद - एक.

हेही वाचलेच पाहिजे - नांदेडकरांना गुड न्यूज : विष्णुपूरी प्रकल्प तुडूंब, एक दरवाजा उघडला

नांदेड कोरोना मीटर

 • एकूण सर्व्हेक्षण - एक लाख ५० हजार ६२७ 
 • एकूण घेतलेले स्वॅब - ३० हजार ५६६ 
 • एकूण निगेटिव्ह स्वॅब - २४ हजार ५६३ 
 • एकूण पॉझिटिव्ह रुग्ण - चार हजार ३२५ 
 • आज मंगळवारी पॉझिटिव्ह रुग्ण - १३८
 • एकूण मृत्यू - १५३ 
 • आज मंगळवारी मृत्यू - चार 
 • एकूण रुग्णालयातून सुटी दिलेले रुग्ण - दोन हजार ५६१ 
 • आज मंगळवारी सुटी दिलेले रुग्ण - ८४ 
 • सध्या रुग्णालयात उपचार सुरू असलेले रुग्ण - एक हजार ५८० 
 • आज गुरूवारी प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या - १०४ 
 • आज गुरूवारी गंभीर प्रकृती असलेले रुग्ण - १८२

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The number of corona-free patients in Nanded is over two and a half thousand, Nanded news