नांदेडला कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढताच, मंगळवारी ६१ पॉझिटिव्ह, ३३ रुग्ण कोरोनामुक्त 

File photo
File photo

नांदेड : आठवड्याभरापूर्वी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अडीचशेवर आली होती. मात्र, मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. मंगळवारी (ता.२४) आलेल्या अहवालात ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर ६१ जणांना नव्याने कोरोनाची लागण झाली. कोरोनातुन बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ९५ टक्यावरुन ९४.४१ टक्यावर आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी सांगितले. 

सोमवारी (ता. २३) घेण्यात आलेल्या स्वॅब तपासणीतील एक हजार ९७१ अहवाल मंगळवारी (ता.२४) प्राप्त झाले. त्यामधील एक हजार ८५३ अहवाल निगेटिव्ह असून ६१ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या २० हजार १०३ इतकी झाली आहे. 

मंगळवारी दिवसभरात  श्रीगुरु गोविंदसिंघजी स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय -तीन, महापालिकेंतर्गत - १६, देगलूर कोविड रुग्णालय व गृह विलगीकरण-एक आणि खासगी कोविड केअर सेंटरमधील - १३ असे ३३ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातुन सुटी देण्यात आली. आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १८ हजार ९८० इतकी झाली आहे. मंगळवारी एकही मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत उपचारादरम्यान मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या ५४५ इतकी आहे.   

मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालात नांदेड महापालिका क्षेत्रात - ३२, नांदेड ग्रामीण - एक, किनवट - पाच, भोकर - एक.., कंधार - दोन, देगलूर - एक, नायगाव - दोन, मुखेड - दोन, धर्माबाद- चार, अर्धापूर - एक, हिमायतनगर - तीन, मुदखेड - एक आणि परभणी एक असे ६१ कोरोना बाधित आढळुन आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या २० हजार १०३ इतकी झाली आहे. त्यापैकी १८ हजार ९८० रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. ५४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३८५ बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

त्यामधील १६ कोरोना बाधित रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरुपाची आहे. मंगळवारी आलेल्या अहवालामध्ये आरटीपीसीआर तपासणी द्वारे ३५ तर अॅंटीजन तपासणीद्वारे २६ असे एकूण ६१ अहवाल पॉझिटिव्ह आलेले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत शासकीय वैद्यकिय महाविद्यालय विष्णुपुरी येथे १७५ तर जिल्हा रुग्णालयात ८१ खाटा उपलब्ध होत्या.
  
कोरोना मीटर

  • मंगळवारचे पॉझिटिव्ह रुग्ण - ६१
  • मंगळवारचे कोरोनामुक्त - ३३  
  • मंगळवारी मृत्यू - शून्य
  • एकूण पॉझिटिव्ह - २० हजार १०३ 
  • एकूण कोरोनामुक्त -  १९ हजार ९८०
  • एकूण मृत्यू -   ५४५
  • उपचार सुरु -   ३८५
  • गंभीर रुग्ण -   १६
  • स्वॅब अहवाल प्रलंबित - ५८७

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com