esakal | जागतिक मानव अधिकारदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

तसेच एखाद्या आजारावरुन आपल्याला एखाद्या व्यक्तीला बहिष्कार करता येणार नाही. कारण सध्या जगाला कोरोना नावाच्या महामारीमुळे जणू थांबायला लावले. हा आजार ज्यांना झाला त्यांना काही प्रमाणात लोकांनी अप्रत्यक्ष दूर केले होते,

जागतिक मानव अधिकारदिनानिमित्त विद्यार्थ्यांनी केला व्यसनमुक्तीचा संकल्प

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड - जागतिक मानव अधिकार दिनानिमित्त लोहा तालुक्यातील मारतळा येथील साईबाबा हायस्कूल, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्येसाजरा करण्यात आला. यावेळी सहशिक्षक रवी ढगे यांनी या दिनाचे महत्त्व सांगितले. यात जात, धर्म, वंश, लिंग, रंग व राष्ट्रीयत्व यावरुन आपल्याला भेदभाव करता येणार नाही. सर्वांना सारखेच अधिकार संविधानाने दिले आहे.

तसेच एखाद्या आजारावरुन आपल्याला एखाद्या व्यक्तीला बहिष्कार करता येणार नाही. कारण सध्या जगाला कोरोना नावाच्या महामारीमुळे जणू थांबायला लावले. हा आजार ज्यांना झाला त्यांना काही प्रमाणात लोकांनी अप्रत्यक्ष दूर केले होते, असे आपणास करता येणार नाही. तर शारिरीक अंतर ठेवून त्यांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी सज्ज राहणे आवश्यक आहे. हा तर खरा मानव अधिकार दिन साजरा करणे होय. तसेच मानवाधिकारदिनाचे औचित्य साधून सलाम मुंबई फाउंडेशन व प्राथमिक शिक्षण संचनालय पुणे यांच्या वतीने सुरु असलेल्या तंबाखुमुक्त शाळा अभियान अंतर्गत सहभागी संस्था युवा प्रतिष्ठान नांदेड मार्फत खास शालेय विद्यार्थ्यांनी संकल्प करुन जागतिक मानव अधिकार दिनापासून मी व्यसनमुक्त राहील आणि समाज व्यसनमुक्त राहील, यासाठी नेहमी दक्ष राहील, असा सर्व विद्यार्थ्यांनी संकल्प केला आहे. 

हेही वाचा -  रामेश्वरम- ओखा- रामेश्वरम उत्सव विशेष गाडीच्या सहा फेऱ्या डिसेंबरमध्ये -

यामुळे येणाऱ्या काळात नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा तंबाखुमुक्त शाळा तर  व्यसनमुक्त गाव ही लोक चळवळ होण्यास मदत होणार आहे. हा दिन साजरा करताना शारिरीक अंतर ठेवण्यात आले होते. यावेळी रवी ढगे, साईबाबा हायस्कूलचे मुख्याध्यापक एकनाथ मोरे, जी. आर. पालदेवार, पाटोदेकर, येडे, मुलूकवार, ढगे, शिंदे, श्रीमती कदम, यू. एम. पाटोदेकर, मेथे, तुंबरफळे, उबाळे, माधुरी मलदोडे, जयश्री बारोळे, देवबा होळकर, रमेश हणमंते व विद्यार्थी उपस्थित होते.
 

loading image