esakal | अधिकारी- कर्मचार्‍यांच्या आरक्षण प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना कटीबद्ध- भारत वानखेडे

बोलून बातमी शोधा

file photo}

बॅटल ऑफ भिमाकोरेगाव चित्रपट संघटना नांदेड ला प्रथम शो करणार

अधिकारी- कर्मचार्‍यांच्या आरक्षण प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना कटीबद्ध- भारत वानखेडे
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय कर्मचार्‍यांना त्यांच्या सेवा कालावधीत येणार्‍या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन संघटनेचे मंत्रालयीन व महाराष्ट्र राज्याध्यक्ष भारत वानखेडे यांनी केले.

नांदेड येथे अनुसुचित जाती- जमाती, विजा- भज, इ. मा. ज. व वि. मा. प्र. शासकिय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबईची विभागीय बैठक व लातुर विभागीय पदाधिकार्‍यांच्या निवडीची बैठक नुकतीच हॉटेल ताज येथे संपन्न झाली. राज्य अध्यक्ष मंत्रालय व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भारत वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली. यावेळी प्रदेश सचिव डॉ. उत्तमराव सोनकांबळे, राज्य महासचिव राजेंद्र धावरे, राज्य संघटन सचिव संजय चुरमुळे, लातूर विभागीय अध्यक्ष बालाजी बागल, जिल्हाध्यक्ष नांदेड जगनराव गोणारकर, अनिल गायकवाड, सुरेश अलागुरवार, सुनील वाघमारे, दीनानाथ जोंधळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

कास्ट्राईब संघटनेचे लातूर विभागीय अध्यक्ष सुरेश अरगुलवार, जिल्हाध्यक्ष दिनानाथ जोंधळे, सुनील वाघमारे यांच्यासह बऱ्याच पदाधिकार्‍यांनी या संघटनेत प्रवेश केला. त्यांचे संघटनेत स्वागत करण्यात येऊन त्यांना विविध पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. डॉ. उत्तमराव सोनकांबळे यांनी आपले अनुभव सांगून मन लाऊन संघटनेचे कार्य करा. आपली संघटना आपल्या पाठीशी आहे. सर्व नूतन पादाधिकार्यांनी आपले विचार व्यक्त केले. 

यावेळी अध्यक्षीय समारोप करताना प्रदेशाध्यक्ष भारत वानखेडे म्हणाले की, संघटनेने आतापर्यंत शेकडो अधिकारी कर्मचार्‍यांचे प्रश्न सोडवले असून हे अविरतपणे सुरु राहणार आहे. आरक्षणातील पदोन्नतीसाठी अहोरात्र परिश्रम घेत असून हा प्रश्न आम्ही लावून धरला आहे. संघटनेने छोट्या कामासाठी उपोषण धरणे आंदोलन करुन शक्ती खर्ची करु नये, लेखणीतून आपले हक्क दाखवावे. असे मत व्यक्त करताना नव्याने येणारा बॅटल ऑफ भिमाकोरेगांव हा चित्रपट नांदेडमध्ये प्रथम दाखवण्यात येण्याची ग्वाही दिली.

सध्या आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला जात असून त्यासाठी संघर्ष अटळ असल्याचे सांगीतले. नांदेड जिल्ह्यातील पदाधिकार्‍यासह लातूर विभागातील अधिकार्‍यांची निवड झाली असून येणारे १६ वे अधिवेशन नांदेडला घेण्याचे आवाहन वानखेडे यांनी केले. आपली संघटना कोणत्याही एका समाजाची नसून बहुजनांची आहे व कोणत्याही पक्षाची नाही असे ही वानखेडे यांनी स्पष्ट केले.