esakal | नांदेड जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषद नांदेड

नांदेड जिल्हा परिषदेत अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या

sakal_logo
By
प्रमोद चौधरी

नांदेड : जिल्‍हा परिषदेअंतर्गत (Nanded Zilla Parishad) येणाऱ्या गट- क व गट - ड कर्मचाऱ्यांच्‍या सार्वत्रिक बदली प्रक्रियेत सामान्य प्रशासन विभागातील ९२ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बदल्या समुपदेशनाद्वारे शनिवारी (ता.३१) करण्यात आल्या. गेल्या आठ दिवसांपासून जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व विभागातील गट क व गट ड कर्मचारी व अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरु होती. या प्रक्रियेचा शनिवारी समारोप झाला. शेवटच्या दिवशी सामान्‍य प्रशासन विभागाच्‍या समुपदेशनाद्वारे (Nanded) बदल्‍या करण्‍यात आल्‍या. यात ९२ अधिकारी - कर्मचार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सहायक प्रशासन अधिकारी पदाच्या दोन बदल्या प्रशासकीय कारणावरून करण्यात आल्या. कनिष्ठ सहायक प्रशासन अधिकारी संवर्गात सात बदल्या झाल्या असून यात तीन प्रशासकीय व चार विनंतीवरुन बदल्या झाल्या. वरिष्ठ सहायक या पदाच्या १८ बदल्या झाल्या असून प्रशासकीय सहा तर विनंतीच्या १२ बदल्या आहेत.(officers, staffs transfered under nanded zilla parishad glp88)

हेही वाचा: बॉलिवूडलाही पडली औरंगाबादची भुरळ! २० ते ३० दिवसांचे चित्रीकरण

तर कनिष्ठ सहायक पदाच्या ६२ बदल्या झाल्या असून यामध्ये प्रशासकीय २८ तर विनंतीवरून ३७ बदल्यांचा समावेश आहे. जिल्‍हा परिषदेच्‍या कै.यशवंतराव चव्‍हाण सभागृहात झालेल्या बदली प्रक्रियेत जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा मंगाराणी अंबुलगेकर, मुख्‍य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्‍हा परिषद उपाध्‍यक्षा तथा आरोग्‍य सभापती पद्मा नरसारेड्डी सतपलवार, शिक्षण व बांधकाम सभापती संजय बेळगे, कृषी व पशुसंवर्धन सभापती बाळासाहेब रावणगावकर, समाजकल्‍याण सभापती अॅड.रामराव नाईक, अतिरिक्‍त मुख्‍य कार्यकारी अधिकारी, डॉ. शरद कुलकर्णी, मुख्‍य लेखा व वित्‍त अधिकारी रावसाहेब कोलगणे, सामान्‍य प्रशासन विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे आदींची उपस्थित होते.

loading image
go to top