
नांदेड - एमजीएम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्थी ओमकार सोळंके याने बीटेक (स्थापत्य अभियांत्रिकी) पदवी प्रावीण्यासह उत्तीर्ण करताना संघर्षाचा प्रवास केला. खडतर परिस्थितीला तोंड देत त्याने डेहराडून येथील मिलिटरी अकादमीतून खडतर प्रशिक्षण पूर्ण केले असून आता तो भारतीय सैन्य दलाचा अधिकारी म्हणून रुजू झाला आहे.