esakal | मरणाच्या भितीने नागरिक शेतवस्तीवर; शहरातील लोंढे पुन्हा गावात दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

मुक्रमाबाद

मरणाच्या भितीने नागरिक शेतवस्तीवर; शहरातील लोंढे पुन्हा गावात दाखल

sakal_logo
By
विनोद आपटे

मुक्रमाबाद ( जिल्हा नांदेड ) : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने आता अतिशय उग्ररुप धारण केले असून या महामारीने गाव, वाडी, तांड्यावर शिरकाव केलाअसून घर तिथे रुग्ण आढळत आहेत. पहिलेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असताना शहरातील लोढे परत गावात येत आहेत. ते शासनाने घालून दिलेल्या नियमावलीचे कुठलेच पालन करत नाहीत. बिनधास्त गावात फिरत असल्यामुळे रुग्णात आणखीच भर पडत आहे. कोरोना होईल याभितीने गावातील लोक हे, आपले कुटुंब घेऊन शेतवस्तीवर राहायला गेले आहेत.

कोरोनामुळे श्रीमंतासह सर्व सामान्य नागरिकांचे जगणे मोठे मुश्किल बनले आहे. पहिले ही, महामारी शहरात होती. पण आता ग्रामीण भागात पसरली असून रोज रुग्णांचा व मृत्यूचा आकडा हा थक्क करणारा येत आहे. त्यात ग्रामीण भागातील सर्वच यंत्रणा ही कुचकामी ठरत आहे. अपुरे वैधकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, त्यात अपुरा औषधीसाठा रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. रुग्णांना पुढील उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहीका नाहीत. ज्याठीकाणी आहेत. त्याठिकाणी चालक नाही. ज्याठीकाणी चालक आहे. त्याठिकाणी रुग्णवाहीका नाही. अशा भयाण परिस्थितीत ग्रामीण भागातील येथील आरोग्य यंञणा सापडलेली आहे. तर जीवावर उद्धार होऊन आपली सेवा बजावताना अनेक कर्मचाऱ्यांना व त्यांच्या कुटुंबाला कोरोनाला सामोरे जावे लागत आहे.

हेही वाचा - नांदेड : मांजरम परिसरात अवकाळी पाऊस; विज पडून म्हैस व वासरु ठार

अशाच तुटपुंज्या कर्मचाऱ्यांवर व औषधी साठ्यावर ग्रामीण भागातील नागरिकांचे जीव वाचविण्यासाठी येथील आरोग्य विभाग हा नशीबालाच दोष देत काम करत असताना माञ शहरातील लोक हे, रोज मिळेल त्या वाहनाने भरभरून गावात येत आहेत. बाहेरून आलेल्या लोकांची कुठल्याच प्रकारे तपासणी करण्यात येत नाही. ते तोंडाला मास्क न घालता सामाजिक अंतर न ठेवता घोळक्याने बिनधास्तपणे गावातील मंदिर , गल्लो गल्ली सार्वजनिक ठिकाणी फिरत आहेत. तोंडाला मास्क लावा व सामाजिक अंतर ठेवा असे जर कोणी सांगितले तर त्यांच्यावर हे, टोळके भांडणे करण्यासाठी धावून जात असल्यामुळे यांना कोणीच काही म्हणत नसल्यामुळे कोरोना हा वाढत आहे.

आरोग्य यंञणा रामभरोसे आणि शहरातून गाड्या भरुन येणारे लोढें यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. अशा भयाण परिस्थितीत आपल्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर उपचार करण्यासाठी आपली तेवढी ऐपत नाही. ही सर्व परिस्थिती लक्षात घेऊन गावातील नागरिक हे या संकटातून आपला व आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्यासाठी शेतातच राहाणे पसंत केले आहे.

कोरोना महामारीची दुसरी लाट गावागावात पोहचली

लोकांमध्ये कोरोनाबद्द्ल काळजी ऐवजी भीतीचे वातावरण आहे. ही परिस्थिती हाताळण्यासाठी कोणतीच उपाययोजना राबवली जात नाही. लोकांमध्ये पसरलेल्या भीतीचे स्वरुप प्रचंड आहे. दवाखान्याकडून लूट होत असल्याने, सामान्य माणूस रोग अंगावर काढत आहेत. गावातील या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष असल्यामुळे आपला जीव वाचविण्यासाठी गावातील लोकआता शेतात जाऊन राहात आहेत.

- शिवशंकर पाटील कलंबरकर, जिल्हा युवा अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image