Ramadan : रमजान सुरु होताच खजुराची मागणी वाढली

बाजारपेठांमध्ये आवक सुरू; सलग चार वर्षांपासून एप्रिल महिन्यात रमजान
on occasion of ramadan demand for date palm  increased dry friut
on occasion of ramadan demand for date palm increased dry friutsakal

माहूर : गुरूवारी (ता. २३) सायंकाळी चंद्रदर्शन झाल्याने इस्लामी कालगणनेतील रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी मुस्लीम बांधवांचा पहिला रोजा पार पडला. रमजानचा रोजा सोडताना इफ्तारमध्ये खजूर खाण्याची प्रथा असल्याने रमजान महिन्यात खजुरांच्या विक्रीत वाढ होते. यंदा बाजारपेठेत रमजान सुरु होताच खजुरांची मागणी देखील वाढली आहे.

बाजारात मध्य पूर्वेच्या देशांमधून येणाऱ्या खजुराला जास्त मागणी आहे. ट्युनिशिया येथील खजूर दोनशे ते अडीच रुपये, तर इराणमधील ब्लॅक लिली खजूर २४० ते २५० रुपये किलो दराने उपलब्ध आहे. सौदी अरेबिया येथील नावर जुमेरा खजुरासाठी किलोमागे २४० रुपये मोजावे लागत आहेत. या शिवाय इराकमधील जाएदी खजुरालाही चांगली मागणी आहे.

अजवा खजुराची किंमत सध्या एक हजार ते दीड हजार रुपये किलो आहे. ती देखील १० ते १५ टक्क्यांनी वाढली आहे. या शिवाय कलमी, ओमानी, मस्कटी खजूर असे पर्याय उपलब्ध आहेत. खजुरांच्या किंमतीत १५ ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. किमिया या खजुराला मोठी मागणी असून, त्याचा दर सहाशे ग्रॅमसाठी १२० ते १३० रुपयांवरून १५० रुपयांवर गेला आहे. ७० रुपये किलो दराने मिळणाऱ्या साध्या खजुराची किंमतही ९० रुपयांपेक्षा पुढे गेली आहे. विविध दुकानात खजूर विक्रीसाठी उपलब्ध आहेत.

मशिदीत तरावीहची नमाजचे आयोजन

गुरूवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर रात्री साडेआठनंतर तरावीहची विशेष नमाज प्रत्येक मशिदीमध्ये अदा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ती काही ठिकाणी दहा दिवस तर काही ठिकाणी तीस दिवस रोज रात्री चालणार आहे. व्यापारी आणि प्रवाशांच्या सोयीसाठी क्वचित ठिकाणी दहा दिवसांच्या तरावीह नमाजचे आयोजन करण्यात आले होते. यात कुरान पाक मधील ३० अध्याय दहा दिवसात नमाजमध्ये पठण केले जातात तर अधिकांश ठिकाणी हे अध्याय दररोज एक प्रमाणे नमाज मध्ये पठण केले जातात.

सलग चौथ्या वर्षी मार्च - एप्रिलमध्ये रोजे

रमजान महिना उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात येण्याचे यंदाचे चौथे वर्षे आहे. या आधी २०२० मध्ये २५ एप्रिल, २०२१ ला १४ एप्रिल तर २०२२ ला ता. तीन एप्रिल रोजी रमजान पर्व सुरु झाले होते. यंदा ता. २३ मार्चपासून रमजान सुरु झाले असले तरी चार आठवडे रमजान एप्रिल महिन्यात येत आहेत. दरम्यान, आता बाजारपेठेतही खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com