esakal | बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या 'ही' महत्वाची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

भगवान बुद्ध

Buddha Jayanti: बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने जाणून घ्या 'ही' महत्वाची माहिती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : ता. २६ मे रोजी वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म झाला. म्हणून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो. बुद्धांनी जगाला शांततेचा संदेश दिला व मानवतावादी धम्माचे आचरण करण्यास सांगितले. त्यांच्या कार्याचे स्मरण करून बौद्ध धम्माबद्दल काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहुयात...

१) गौतम बुद्धांचा जन्म कधी व कुठे झाला ?

~ इसपू ५६७ लुम्बिनी

२) गौतम बुद्ध कोणत्या वंशाचे होते ?

~ शाक्य

३) गौतम बुद्धांच्या वडिलांचे नाव होते ?

~ शुद्धोधन

४) गौतम बुद्धांच्या आईचे नाव होते ?

~ महामाया

५) गौतम बुद्धांच्या मावशीचे नाव होते ?

~ प्रजापती गौतमी

६) गौतम बुद्धांच्या पत्नीचे नाव होते ?

~ यशोधरा

७) गौतम बुद्धांच्या मुलाचे नाव होते ?

~ राहुल

हेही वाचा - रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

८) गौतम बुद्धांनी पहिले प्रवचन कोठे दिले ?

~ सारनाथ

९) बौद्ध धम्मातील प्रमुख ग्रंथ कोणता ?

~ त्रिपिटक

१०) गौतम बुद्धांच्या गृहत्यागाच्या घटनेस काय म्हणतात ?

~ महाभिनिष्क्रमण

११) गौतम बुद्धांच्या मृत्यूच्या घटनेस काय म्हणतात ?

~ महापरीनिर्वाण

१२) गौतम बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीच्या घटनेस काय म्हणतात ?

~ संबोधि प्राप्ती

१३) गौतम बुद्धांना कोणत्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली ?

~ पिंपळ (बोधिवृक्ष)

१४) गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली ?

~ गया (बोधगया)

१५) गौतम बुद्धांना कोणत्या नदीकाठी ज्ञानप्राप्ती झाली ?

~ निरंजना

१६) गौतम बुद्धांना कोणत्या दिवशी ज्ञानप्राप्ती झाली ?

~ वैशाखी पौर्णिमा

१७) गौतम बुद्धांच्या पहिल्या प्रवचनास काय म्हणतात ?

~ धम्मचक्र प्रवर्तन

१८) गौतम बुद्धांचे महापरीनिर्वाण कधी व कोठे झाले ?

~ इसपू ४८७ कुशीनगर

१९) गौतम बुद्धांच्या अस्थीवर बांधलेल्या वास्तुस काय म्हणतात ?

~ स्तूप

२०) बौद्ध धम्मातील सुधारणावादी पंथ कोणता ?

~ महायान पंथ

२१) बौद्ध धम्मातील कर्मठ पंथ कोणता ?

~ हिनयान पंथ

२२) हिनयान पंथातील ग्रंथ कोणत्या भाषेत आहे ?

~ पाली, प्राकृत

२३) बोधिसत्व ही कोणत्या पंथातील संकल्पना आहे ?

~ महायान पंथ

२४) महायान पंथातील साहित्य कोणत्या भाषेत आहे ?

~ संस्कृत

येथे किल्क करा - रुग्णांकडून पैसे उकळणाऱ्या रुग्णालयांना दणका; पैसे परत करण्याचे आदेश

२५) पहिली बौद्ध धम्म परिषद कधी व कुठे आयोजित करण्यात आली ?

~ इसपू ४८७, राजगृह

२६) पहिल्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

~ महाकश्यप

२७) पहिल्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?

~ अजातशत्रू

२८) दुसरी बौद्ध धम्म परिषद कधी व कुठे आयोजित करण्यात आली ?

~ इसपू ३८७, वैशाली

२९) दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

~ सर्वव्यामिनी

३०) दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?

~ कालाशोक

३१) कोणत्या परिषदेत बौद्ध धम्मात दोन गट निर्माण झाले ?

~ दुसरी धम्म परिषद

३२) बौद्ध धम्मातील त्रिरत्ने कोणती ?

~ बुद्ध, धम्म, आणि संघ

३३) तिसरी बौद्ध धम्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली ?

~ इसपू २५५, पाटलीपुत्र

३४) तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

~ मोगलीपुत्त तिस्स

३५) तिसऱ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?

~ सम्राट अशोक

३६) चौथ्या बौद्ध धम्म परिषद कधी व कोठे आयोजित करण्यात आली ?

~ इसपू. १०२, कुंडलवण

३७) चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष कोण होते ?

~ वसुमित्र

३८) चौथ्या बौद्ध धम्म परिषदेस राजाश्रय कोणी दिला ?

~ सम्राट कनिष्क

३९) चौथ्या बौद्ध धम्म परिषदेचे उपाध्यक्ष कोण होते ?

~ अश्वघोष

४०) कोणत्या परिषदेत हीनयान व महायान पंथ निर्माण झाले ?

~ चौथी बौद्ध धम्म परिषद

४१) बौद्ध धम्मातील तांत्रिक पंथ कोणता ?

~ वज्रयान

४२) बौद्ध धम्म स्वीकारणारा पहिला सम्राट कोण होता ?

~ बिम्बिसार

४३) बौद्ध धम्मात एकूण किती आर्य सत्य सांगितले आहे ?

~ चार

४४) सिद्धार्थ गौतम कोणत्या गणराज्याचे राजपुत्र होते ?

~ कपिलवस्तू

हे उघडून तर पहा - नांदेड महापालिकेला कोरोनामुळे बसला करवसुलीचा फटका

४५) कोणत्या नदीच्या पाणीवाटपावरून शाक्य-कोलिय यांच्यात वाद झाला ?

~ रोहिणी नदी

४६) महाभिनिष्क्रमणानंतर सिद्धार्थाने कोणाचे शिष्यत्व स्वीकारले ?

~ आलारकालाम

४७) बौद्ध धम्माचा स्वीकार करणारी वैशालीची प्रसिद्ध गणिका कोण होती ?

~ आम्रपाली

४८) गौतम बुद्धांनी बौद्ध धम्माच्या प्रसारासाठी कोणती भाषा वापरली ?

~ पाली

४९) भारतातील शेवटचा बौद्ध सम्राट कोण होता ?

~ सम्राट हर्षवर्धन

५०) बौद्ध भिक्खुंच्या निवासस्थानांना काय म्हणतात ?

~ बौद्ध विहार

५१) पुरुषपूर येथील बौद्ध स्तूप कोणी बांधला ?

~ कनिष्क

५२) बौद्ध भिक्खुंच्या ध्यानसाधनेसाठीच्या गुहांना काय म्हणतात ?

~ चैत्य

५३) बुद्धचरित हा ग्रंथ कोणी लिहिला ?

~ अश्वघोष