esakal | दीडशे लिटर विदेशी मद्य जप्त, पाच जणांना अटक
sakal

बोलून बातमी शोधा

फोटो

अवैधरित्या देशी, विदेशी मद्य विकणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला

दीडशे लिटर विदेशी मद्य जप्त, पाच जणांना अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नांदेड : येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पथकांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैधरित्या देशी, विदेशी मद्य विकणाऱ्या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून वाहनांसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई देगलूर परिसरात सोमवारी (ता. सहा) दुपारच्या सुमारास केली. 

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक निलेश सांगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपल्या पथकाकाडून जिल्हाभरात अवैध दारु विक्री करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येत आहे. निरीक्षक एस. एस. खंडेराय आणि दुय्यम निरीक्षक बी. पी. टकले, आर. एस. कोतवाल, बी. एस. पडूळ यांच्या पथकांनी देगलूर व नायगाव तालुक्यात गस्त घालण्यास सुरूवात केली. या दोन्ही पथकांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी देगलूर व नायगाव तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करुन दीडशे लिटर विदेशी दारु व दोन चारचाकी वाहने जप्त केले.

हेही वाचा -  कोरोनाला हरवण्यासाठी बंद हा उपाय योग्य नाही ः डॉ. जेठवाणी

यांची होती पथकातील कामगीरी 

या विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत पथकांनी एक दुचाकी चारचाकी दोन यासोबतच १५० लीटर विदेशी दारु असा सात लाखाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पथकांनी पाच आरोपीना अटक केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रतिबंधात्मक कारवाईनंतर त्यांना सोडण्यात आले. या कारवाईत एस. एस. खंडेराय, दुय्यम निरीक्षक बी. पी. टकले, आर. एस. कोतवाल, बी. एस. पडूळ, जवान अरविंद जाधव, यु. जी. सदावर्ते, चालक व्ही. टी. खिल्लारे, एम. यु. अनकांडे, एन. पी. भोकरे, एस. जी. संगेवार, श्री. नारखेडे यांनी परिश्रम घेतले. 

अवैध दारु विक्री व साठा करून ठेवणाऱ्यांवर हदपारीचा प्रस्ताव

जिल्ह्यात किनवट, माहूर, धर्माबाद, देगलुर, कुंडलवाडी, मुदखेड या परिसरात अवैध दारु विक्री व हातभट्टी दारु मोठ्या प्रमाणात तयार करतात. मात्र आमचे पूर्ण अशा हातभट्टी अड्ड्यावर असून वेळोवेळी संबंतीवार कारवाई करण्यात आली आहे. नांदेड शहर व जिल्ह्यात बनावट दारु तयार करणारे कारखाने उद्धवस्त केले असून काही प्रमाणात तयार होणारी हातभट्टी ही लपूनछपून तयार करीत असल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे. देशी, विदेशी, हातभट्टी आणि ताडी अवैधरित्या विक्री किंवा साठे करणाऱ्यांविरुद्ध कडक पाऊले उचलण्यात येत असून अशा लोकांची धरपकड सुरू करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात अवैध दारु विक्री व साठा करून ठेवणाऱ्यांवर हदपारीचा प्रस्ताव यापूर्वीच उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला आहे. 
निलेश सांगडे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, नांदेड.