esakal | दिलासा! नांदेडमध्ये केवळ एकच जण कोरोना पॉझिटिव्ह
sakal

बोलून बातमी शोधा

File Photo

दिलासा! नांदेडमध्ये केवळ एकच जण कोरोना पॉझिटिव्ह

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : महापालिका (Nanded Municipal Corporation) क्षेत्रात वर्दळ असताना देखील महापालिका क्षेत्रातील बाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील अनेक गावास कोरोनाचा (Corona) शिरकाव झाला नव्हता. असे असताना देखील अनेक गावात कोरोनाला गंभीरपणे घेतले जात नसल्याने काही तालुक्याच्या ठिकाणची बाधित रुग्णांची संख्या कमी होत नाही. रविवारी (ता.१२) जिल्ह्यातील हिमायतनगर (Himayatnagar) येथे एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रविवारी दिवसभरात जिल्ह्यातील कोरोनाबाधित आजाराने गंभीर असलेल्या बाधितांपैकी एकाही बाधितांचा मृत्यू झाला नाही.

हेही वाचा: जालन्यात फुलांनी खाल्ला भाव, हाराची जोडी पाचशेला

त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या दोन हजार ६५१ वर स्थिर आहे. रविवारी ५२७ अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यापैकी एका व्यक्तीचा अहावाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ९० हजार २८२ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ८७ हजार ५९८ इतकी आहे. सध्या जिल्हाभरात ३३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून, त्यापैकी चार बाधितांची प्रकृती गंभीर आहे.

कोरोना मीटर

एकूण पॉझिटिव्ह - ९० हजार २८२

एकूण कोरोनामुक्त - ८७ हजार ५९८

एकूण मृत्यू - दोन हजार ६५१

रविवारी पॉझिटिव्ह - एक

रविवारी कोरोनामुक्त - तीन

रविवारी मृत्यू - शून्य

उपचार सुरु - ३३

गंभीर रुग्ण - चार

loading image
go to top