esakal | जालन्यात फुलांनी खाल्ला भाव, हाराची जोडी पाचशेला
sakal

बोलून बातमी शोधा

जालना : गणेशोत्सव, गौरीचा सण असल्याने बाजारात विविध फुलांच्या हाराला मोठी मागणी वाढली आहे.

जालन्यात फुलांनी खाल्ला भाव, हाराची जोडी पाचशेला

sakal_logo
By
सुहास सदाव्रते

जालना : गणेशोत्सव (Ganeshustav), गौरीचा सण असल्याने बाजारात विविध फुलांच्या हाराला मोठी मागणी वाढली आहे. सोमवारी (ता.१३) महालक्ष्मी पूजन (Mahalaxmi Pujan) असल्याने फुलांच्या हाराचे भाव चांगलेच वधारले आहेत. हारजोडीला पाचशे रूपयांचा भाव आहे. शहरात गणेशोत्सवासह गौरीचा सण उत्सवात साजरा होत असल्याचे घरोघरी चित्र दिसून येत आहे. सण असल्याने विविध फुलांच्या (Flower) हाराला मोठी मागणी आहे.दरम्यान मागील आठवड्यात पाऊस होता.यामुळेच बाजारात फुलांची आवक सध्या कमीच आहे. सण असल्याने फुले आणि हारासाठी नागरिक महत्त्व देतात. परंतु गौरीपूजनाच्या दिवशी शहरात फुलांचे हाराचे भाव चांगलेच वधारले आहे. निशिगंध, झेंडू, गुलाब यासह विविध फुलांचे हार जोडी घेण्यास नागरिक पसंती देतात. दोन (Jalna) हाराची किंमत पाचशे रुपये असल्याचे संतोष राठी यांनी सांगितले.

हेही वाचा: नांदेड जिल्ह्यात केवळ ४४७ जणांची कोरोना चाचणी, पाच पाॅझिटिव्ह

मागच्या आठवड्यात पावसाने फुलांचे मोठे नुकसान झाले.आपल्याकडे माल कमी आहे. दुसरीकडून फुले येत असल्याने भाव वाढले असल्याचे फुल विक्रेता जमीर दरगैवाले यांनी सांगितले. शहरातील गांधी चमन, फूल बाजार, शनिमंदिर, उड्डाणपूल परिसरासह अनेक ठिकाणी फुलांची दुकाने थाटली आहेत. महालक्ष्मी सणाला फुलांचे महत्त्व आहेच. परंतु सजावट करण्यासाठी फुले घ्यावीच लागतात. काल परवा एवढा भाव नव्हता आज फुलांच्या हाराला पाचशे रुपये जोडीला भाव असल्याचे अनिता कुलकर्णी यांनी सांगितले.

हेही वाचा: गंगापूर : पर्जन्य अहवाल चुकीचा दिल्याने शेतकऱ्यांचे उपोषण

गौरीपूजनाला फुलांचे हार महत्वाचे आहेत. दोन हारांच्या जोडीचा भाव पाचशे रुपये होता. सण असल्याने फुलांचे भाव वाढले असतील एरव्ही तीस चाळीस रुपयात हार येतो. सामान्य लोकांच्या घरात एवढे महागाचे हार कसे येणार.

- कल्याण दाभाडकर, नागरिक, जालना

loading image
go to top