esakal | वऱ्हाडाच्या टेम्पोला मुखेडजवळ भिषण अपघात: एक ठार तर ३१ जण जखमी
sakal

बोलून बातमी शोधा

मुखेडजवळ अपघात

वऱ्हाडाच्या टेम्पोला मुखेडजवळ भिषण अपघात: एक ठार तर ३१ जण जखमी

sakal_logo
By
सुनिल पौळकर

मुखेड ( जिल्हा नांदेड ) : सलगरा बु. (ता. मुखेड) येथील इंदभारत उर्जा कंपनी जवळ वऱ्हाडाचा टेम्पो पल्टी खाऊन प्रशांत जनार्दन सूर्यवंशी (वय २२) हा युवक ठार तर ३१ जण जखमी झाल्याची घटना मंगळवारी (ता. १५ ) सकाळी आकरा वाजता घडली. जखमीना नांदडेच्या विष्णुपूरी शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. काही जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते.

या बाबत अधिक माहिती अशी की, उदगीर तालुक्यातील हाळी येथील वर मंडळीचे वऱ्हाड टेम्पो (एमएच ०४ ई बी ३५२५) या टेम्पोने घेऊन बिलोली तालुक्यातील कार्ला येथे घेऊन जात होते. सदरचा टेम्पो हा मुखेड जवळ असलेल्या इंदभारत उर्जा कपनीजवळ येताच चालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने अपघआत घडला. टेम्पो रस्त्यावर पल्टी होऊन १० मीटर घसरत रस्त्याच्या खाली पडला. यात विशेष करुन सर्वाधीक महिला वऱ्हाडी बसलेल्या होत्या. तर पुरुषाची संख्याही कमी होती. प्रथम दर्शनीय व्यक्तीच्या माहितीनुसार टेम्पो हा अती वेगाने जात होता. समोरुन काहीच येत ननसतानाही टेम्पो पल्टी झाला आहे.

हेही वाचा - दिडवर्षात महाआघाडी सरकारला मिळालेल यश भाजपच्या डोळ्यात खुपत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री अशोक चव्हाण यानी केले आहे.

दरम्यान या अपघातात ३४ जण जखमी झाले असून यातील एक प्रशांत जनार्दन सूर्यवंशी ( वय २५ ) वर्ष हा मूत्यू पावला. तर जखमीवर मुखेड येथील उप जिल्हा रुग्णालायात डाॅ. शोभा देवकत्ते, डाॅ. उमाकांत गायकवाड डाॅ. अंजली कवळे व आरोग्य कर्मचारी लखन पवार, प्रशांत बनसोडे यांनी प्रथम उपचार करुन २५ जखमीना पुढील उपचारासाठी नांदेड येथील रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. यात चार जखमी गंभीर स्वरुपाचे आहेत. या अपघातामुळे हाळी येथे शोककळा पसरली असल्यांची माहिती जखमीच्या नातेवाईकानी दिली. याबाबत मुखेड पोलिसात अजूनपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही अशी माहिती पोलिस ठाण्यातून देण्यात आली.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image